♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

आठ दिवसात भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलन; मनोज लाहुडकार

MH 28 News Live, उदयनगर : उदयनगर परिसरातील २५ ते ३० गावातील २८ डिसेंबर २०२१ रोजी झालेल्या गारपिटीमुळे तब्बल सात हजार शेतकऱ्यांचा तीन हजार दोनशे हेक्टर क्षेत्रावरील शेत शिवरात संत्रा, तूर, गहू, हरबरा, कांदा, पपई सह इतर पिकांचे नुकसान झाले होते. महसूल, कृषी तथा पंचायत विभाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामे करत वरिष्ठ कार्यालयाला अहवाल सादर केले होते. परंतू अद्यापपर्यंत कोणती ही नुकसाभरपाई न मिळाल्यामुळे उदयनगर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

सविस्तर असे की उदयनगर परिसरातील २५ ते ३० खेडे गावातील शेत शिवारात २८ डिसेंबर रोजी झालेल्या गारपिटीमुळे तब्बल सात हजार शेतकऱ्यांच्या तीन हजार दोनशे हेक्टरवरील तूर, गहू, हरबऱ्या सह विविध पिकांचे नुकसान झाले होते. नंतर संबंधित विभागाकडून पंचनामे करून वरीष्ठ कार्यालयाला अहवाल सादर करण्यात आले होते. नंतर शेतकऱ्यांकडून वेळोवेळी निवेदन देण्यात आले होते परंतू नुकसानभरपाई न मिळाल्यामुळे १५ मार्च रोजी खामगाव चिखली राष्ट्रीय महामार्ग वरील उदयनगर चौफुली वर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ सर्व पक्षीय संघटनांनी सहभाग नोंदवला असून सरकारविरोधी घोषणा करण्यात आली. यावेळी तहसिलदार मुंडे साहेबांनी लेखी आश्वासन देऊन आंदोलनाची सांगता करण्यात आली.

यावेळी उदयनगर चे सरपंच मनोज लाहुडकार, जितेंद्र पुरोहित, चक्रधर लांडे, अमोल बोहरपि, ज्ञानेश्वर सवडतकर, शे रफिक शे शब्बीर, राजेश बिडवे, संजय धुरंदर, अमोल तोंडे, विष्णु कुळसुंदर, गजनान कले, महादेव ठाकरे, बंडू बिडवे, महादेव घनमोडे, रामेश्वर कचाले, राजु राठी, महादेव गायवाड, राजु झिने, किरण दानवे, पुरुषोत्तम बोरकर, महावीर जैन, रवि तरळकर, रमेश दांदडे, नारायण जवंजळ, नरेश पाटील, गोपाल महाले, विजय मोरखडे, विलास चव्हाण, ओम राजपूत, शे इल्यास शे मुसा, संघपाल गवई, काका महाले, नारायण कुटे, आकाश राऊत, संतोष पाटील, मुरलीधर क्षीरसागर, अमोल लाहुडकर, पुरुषोत्तम अवचार, पंजाबराव अंभोरे, सुनिल राठोड, प्रवीण डांगे, गणेश काळे सह परिसरातील असंख्य शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129