♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

समृद्धी महामार्गावर लोणार सरोवराची जाहिरात करा : गजेंद्र मापारी

MH 28 News LiVe, लोणार : हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर ‘ अ ‘ वर्ग दर्जा प्राप्त पर्यटन स्थळ असलेल्या लोणार सरोवराची जाहिरात करण्यात यावी अशी मागणी गजेंद्र मापारी यांनी केली आहे.

जागतिक वारसा असलेले लोणार येथील खार्या पाण्याचे सरोवर आहे. समृद्धी महामार्गालगत असलेल्या या सरोवराला भेट देण्यासाठी पर्यटकांना सोयीचे होईल यासाठी अशी मागणी यासाठी सदर महामार्गावर लोणार सरोवराचा जाहिरात फलक लावला जावा अशी मागणी गणेश विविध कार्यकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष तथा माजी नगरसेवक गजेंद्र भीमराव मापारी यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मेहकर मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय रायमुलकर व बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव.यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई या दोन प्रमुख शहरांना कमी वेळात जवळ करण्याचं काम या मार्गाने केलेले आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून गणला जातो मात्र जगप्रसिद्ध लोणार सरोवर विकासापासून ऑपरेटर दुसरी अद्याप मागासलेला असल्याने लोणार सरोवराची जाहिरात या महामार्गावर झाल्यास पर्यटकाचा ओढा लोणार सरोवराकडे निश्चित वाढेल.या मार्गावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना पर्यटकांना जागतिक दर्जा प्राप्त असलेल्या लोणार सरोवराची माहिती व्हावी लोणार कडे येण्यासाठी सिंदखेडराजा दुसरबीड व मेहकर या शहरावरून समृद्धी महामार्गावरून खाली लोणार कडे येता येते याची माहिती हवी म्हणून जागोजागी असलेल्या इंटरचेंजवर लोणार सरोवराकडे जाण्यासाठी दिशादर्शक मार्गदर्शक फलक लावण्यात यावा अशा सूचना संबंधित विभागाला देण्यात याव्या जेणेकरून पर्यटकांना लोणारला येणे सोयीची होईल अशी मागणी गजेंद्र मापारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मेहकर मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय रायमुलकर, खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129