♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

नसतीच भानगड…! पाईपलाईनच्या खड्डात फसला ट्रक. वाहतूक ठप्प मुळे नागरिक हैराण…!

MH 28 News Live, जळगाव जामोद : नळाचे कनेक्शन घेण्यासाठी खोदून ठेवलेल्या खड्यात ट्रक फसल्याची घटना 26 एप्रिल ला शहरातील नाना नानी पार्क समोर या घटनेमुळे पालिका व जीवन प्राधिकरण च्या ठेकेदाराचे पितळ उघडे पडले. शिवाय या रस्त्यावरून ये जा करणार्या वाहन धारकासह नागरिक व ट्रक चालकास नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे. सुदैवाने हा ट्रक पलटी झाला नाही अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.

बऱ्हाणपूर येथून लोखंड घेऊन एम. एच. 21 बि एच 1250 या क्रमांकाचा ट्रक श्री गजानन महाराज मंदिराकडून शहरात येत असताना नाना नानी पार्क समोर नुकताच खोदून ठेवलेल्या खड्यात ट्रक चे मागील टायर फसले त्या मुळे या रस्त्यावरील वाहतूकची कोंडी झाली होती.
मागील काही दिवसांपासून नाना नानी पार्क समोरील रस्त्याची खस्ता हालत झाली आहे त्यातच नळ योजनेची पाईपलाईन फुटून बरेच दिवस झाले तरी पाण्याचा होणार अपव्यय जीवन प्राधिकरणाचे ठेकेदार टाळू शकले नाही. वास्तविक पाहता नळ कनेक्शन घेतांना मालमत्ता धारकाकडून पालिका प्रशासन टॅक्ससह रोड कटिंगचे 500 रु घेतात तसेच रस्ता दुरुस्ती करणे आवश्यक असते तसे इस्टिमेट मध्ये असो किंवा नसो तर माजीप्रचे ठेकेदार नळ कनेक्शन (जोडणी) झाला नंतर ही खड्डा व्यवस्थित बुजवत नाही तर दुसरीकडे पालिकेचे ठेकेदार रस्त्याची लेवल करीत नाहीत त्यामुळे हे असले प्रकार धडताना दिसून येतात. यावर वेळीच काही तरी उपाय करावे अशी मागणी नागरिक करत आहेत.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129