किन्होळा येथे बुध्द पौर्णिमा झाली उत्साहात साजरी
MH 28 News Live, चिखली : तथागत भगवान गौतम बुद्धांची जयंती असलेला बुद्ध पौर्णिमेचा उत्सव तालुक्यातील किन्होळा येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
स्थानिक सम्यक बुद्ध विहारामध्ये वैशाखी पौर्णिमेच्या निमित्ताने दि. ५ मे रोजी सकाळी आठ वाजता भगवान सुकलाल खरात यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे व भारतीय संविधानाची ओळख व्हावी म्हणून भारतीय संविधान हा ग्रंथ विद्यार्थ्यांना दाखवला. त्याचप्रमाणे वर्ग एक ते वर्ग आठ पर्यंतच्या सर्व चर्मकार समाजातील विद्यार्थ्यांना भारतीय संविधान सन्मान पारितोषिक आर्थिक स्वरूपात देण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात त्रिशरण पंचशील घेऊन करण्यात आली.पालकांमध्ये जनजागृती व्हावी व शिक्षणाचा वारसा चांगला जोपासावा शिक्षणाशिवाय आपल्याला पर्याय नाही असे सांगून शिक्षणाचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. या प्रसंगी सरपंच अर्चना वसंता जाधव, पोलीस पाटील नंदकिशोर आत्माराम बाहेकर, मधुकर बाहेकर, तंटामुक्ती अध्यक्ष शेख ताहेर भाई, ग्रामपंचायत सदस्य शेख आरिफ भाई, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक अशोक दादा वानखेडे, युनुस मामू किशोर निकाळजे, बादल जाधव, गजानन जाधव, प्रतीक जाधव, राहुल छेडेदार, चिखली पंचायत समितीचे माजी सभापती दयानंद खरात, रामदास खरात, अर्जुन खरात, किशोर खरात, महानंद खरात अनिल डोंगरदिवे, दिलीप गवई, पुतळा संरक्षण समितीचे अध्यक्ष शेषराव सरदार, तसेच सर्व बौद्ध उपासक उपासिका हजर होत्या. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त गटविकास अधिकारी भीमसेन शिराळे यांची उपस्थिती लाभली. तर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच अर्चना वसंत जाधव यांनी भूषवले. या कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन प्रा. वसंत जाधव शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष यांनी केले. तर आभार प्रदर्शन अशोक वानखेडे यांनी केले.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button