” एक मत धर्मासाठी धर्म रक्षणासाठी ” अपक्ष उमेदवार विजय पवार यांचे मतदारांना आवाहन खेडोपाडी मिळतोय पवार यांना उत्तम प्रतिसाद
MH 28 News Live / चिखली : आपल्या लोकशाही व्यवस्थेत भौतिक विकासाबरोबरच नैतिक आणि धार्मिक मूल्यांचे संवर्धन सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे आणि त्याकरिता धर्माचे रक्षण करण्याची आवश्यकता आहे. ही सध्याच्या काळाची गरज असून ही गरज ओळखून यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आपले एक मत फक्त धर्मासाठी आणि धर्म रक्षणासाठी द्या असे आवाहन हिंदूराष्ट्र सेनेचे जिल्हा प्रमुख तथा चिखली मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विजय पवार मतदारांना केले आहे.
आपल्या निवडणूक प्रचारार्थ विजय पवार हे मतदारसंघातील ग्रामीण भागाचा दौरा करत असून गावोगावी भेटी देऊन मतदारांशी ते संपर्क साधत आहेत. ठिकठिकाणी कार्य करणाऱ्या हिंदूराष्ट्र सेनेच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसमवेत विजय पवार यांनी ग्रामीण भागातील शेतकरी छोटे व्यापारी, युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला. पवार यांच्या भूमिकेला ग्रामीण भागातून उत्तम प्रतिसाद मिळत असून त्यामुळे विजय पवार यांची उमेदवारी दिवसेंदिवस उल्लेखनीय ठरत असल्याचे चित्र चिखली मतदारसंघात पाहायला मिळत आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button