धनशक्तीचा काळा डाग पुसण्यासाठी निवडणूक लढतोय – गणेश उर्फ बंडू बरबडे
MH 28 News Live /
चिखली : लोकशाही प्रक्रियेमध्ये पैशाचा बेसुमार वापर करून मतदारांना अमिष दाखवून धनशक्तीच्या बळावर निवडणूक जिंकण्याचा जो प्रकार चिखली मतदारसंघात मागील काही वर्षापासून सुरू आहे हा चिखली मतदारसंघाला लागलेला काळा डाग आहे. हा डाग पुसण्यासाठी तसेच विकासाला खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी मी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी उभा आहे असे स्पष्टीकरण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष व चिखली मतदारसंघातील मनसेचे अधिकृत उमेदवार गणेश उर्फ बंडू बरबडे यांनी केले. आपल्या उमेदवारीसंदर्भात वार्तालाप करताना ते बोलत होते.
मी सर्वसामान्य कुटुंबातून समाजकारणात आलो त्यानंतर लोकांची कामे करण्याची लोकांच्या समस्या सोडवण्याची आवड असल्यामुळे राजकीय क्षेत्रात पदार्पण केले सुरुवातीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारातून प्रभावी झाल्यामुळे एक शिवसैनिक म्हणून कार्य करायला सुरुवात केली. पुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक हिंदू जननायक राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा खांद्यावर घेतला. एक शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख म्हणून माझी आजपर्यंतची राजकीय वाटचाल झाली आहे. यादरम्यान चिखली शहर व ग्रामीण भागात मनसेच्या मोठ्या प्रमाणावर शाखांची मी व माझ्या सहकाऱ्यांनी केली असून ग्रामीण भागातील संपर्कातून मला येथे असलेल्या समस्यांची जाणीव झाली तसेच धनदांडग्या उमेदवाराकडून पैशाचा वापर ज्या पद्धतीने केला जातो ती पद्धत सुद्धा अयोग्य वाटली. या सर्व बाबतीत विचार केल्यानंतर लोकशाही मार्गाने जनतेसमोर पर्याय देण्याकरिता मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असे बरबडे यांनी सांगितले.
” माझा लढा धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ”
पक्षाकडे उमेदवारी मागितल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मला पक्षाचे अधिकृत उमेदवारी दिली व मी जनतेचा कौल आजमावण्यासाठी या निवडणुकीत उभा आहे. माझा प्रचाराचा सर्व भर हा धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा असून सर्वसामान्य जनतेच्या विकासाला मी सर्वात अधिक प्राधान्य देणार असल्याचे गणेश बरबडे यावेळी म्हणाले.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button