
मौलाना जर्जिस वर कायदेशीर कारवाई करा सकल हिंदू समाजाचे पोलीस प्रशासनाला निवेदन
MH 28 News Live / देऊळगाव राजा : भगवान श्रीकृष्ण हे नमाज पठण करीत होते असे बेताल वक्तव्य करणाऱ्या इटावा येथील मौलाना जर्जिस अन्सारी याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करा ती मागणी सकल हिंदू समाजाने पोलीस प्रशासनाला एका निवेदनाद्वारे केली आहे. या संदर्भात तहसीलदार यांच्यामार्फत गृहमंत्री व राज्याचे मुख्यमंत्री यांना हि निवेदन देण्यात आले आहे.
प्रशासनाला दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, उत्तर प्रदेशातील मौलाना जर्जिस अन्सारी याने एक महिन्यापूर्वी धार्मिक कार्यक्रमात हिंदू धर्माचे भगवान श्रीकृष्ण हे मुसलमान होते व ते पाच वेळेची नमाज अदा करीत होते असा वादग्रस्त दावा केल्याचे युट्युब वरून लक्षात आले. यामुळे हिंदू धर्माच्या भावना दुखावल्याने स्थानिक शासकीय विश्रामगृह येथे जमा होऊन निषेध नोंदविण्यात आला. दरम्यान उत्तर प्रदेश येथील इटावा येथे राहणाऱ्या मौलाना जर्जिस अन्सारी याचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाला निवेदन देऊन हिंदू समाजाच्या भावना दुखावणाऱ्या मौलाना जरजीस विरुद्ध कठोर कारवाई करून गुन्हा नोंदविण्याची मागणी करण्यात आली. निवेदन देताना शिवचंद्र सत्कार, दशरथ लाड, अर्जुन लाड,शंकर वाघमारे, शिवकुमार वाघमारे राजेश भुतडा, डॉ शंकर तलबे, लोकेश डोणगावकर, धर्मराज हनुमंते, प्रवीण धन्नावत, निशिकांत भावसार, नवनाथ गोमधरे, राजेश इंगळे, चेतन वाघमारे,गजानन लाड, सविता पाटील, संचित धन्नावत, सुजित गुंडे, सचिन गायळ, प्रभाकर जगताप शंकर लाड,संदीप शिंदे, स्वप्नील रामाने,सूरज हनुमंते,आदींची उपस्थित होती. प्रशासनातर्फे ठाणेदार ब्रह्मा गिरी, महसूल विभागातील प्रशांत वाघ यांच्यासह पोलिस अधिकारी उपस्थित होते.



