♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

इन्शुरन्सचा वाद पेटला पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवला

MH 28 News Live / देऊळगाव राजा : इन्शुरन्सच्या व्यवहारातून निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान थेट हाणामारीत झाल्याची घटना शुक्रवारी शहरातील अमृत नगर परिसरातील अबूबकर मस्जिदसमोरील रस्त्यावर घडली. या प्रकरणी पोलिसांनी चौघांविरुद्ध मारहाण, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सय्यद साबीर सय्यद रऊफ (वय ३३, रा. अमृत नगर) यांच्या वडिलांशी इन्शुरन्सच्या व्यवहारावरून वाद सुरू होता. त्यावेळी फिर्यादीने, “माझा मोठा भाऊ आल्यानंतर बसून हा वाद मिटवू,” असे सांगितले. मात्र, आरोपींनी संतापून फिर्यादी, त्यांचे वडील व भावाला अश्लील शिवीगाळ करत चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकीही दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

या फिर्यादीवरून देऊळगाव राजा पोलिसांनी शेख रफिक उर्फ रशीद, शेख अतीक शेख रफिक, शेख तौफिक शेख रफिक आणि शेख जुबेर शेख रफिक (सर्व रा. कबाडपुरा, देऊळगाव राजा) यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार नायबराव मोगल करीत आहेत.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129