
…हिंदूओका शेर आया ” सुदर्शन टीव्हीचे संपादक सुरेश चव्हाणके यांचे हिंदुराष्ट्र सेनेकडून जोरदार स्वागत
MH 28 News Live / चिखली : सुदर्शन टीव्हीचे प्रधान संपादक, धर्मयोद्धा सुरेश चव्हाणके यांचे दि. ९ नोव्हेंबर रोजी चिखली शहरात आगमन झाले. यानिमित्त
हिंदुराष्ट्र सेना चिखली शहर, सकल हिंदू समाज गोरक्षक व धर्मनिष्ठांच्या वतीने ” कौन आया रे कौन आया हिन्दुओं का शेर आया ” असा जयघोष करून चव्हाणके यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. या प्रसंगी राकेश चोपडा, दीलीप काकडे, रवि माळवंदे, धनंजय मगर, शिवशंकर मगर, राहुल जवंजाळ, डॉ दत्तात्रय काळे, गजानन गायकवाड, सचिन पवार, शुभम गवई यांच्यासह हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांचे व धर्म निष्ठांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.