♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

गजेंद्र गवई यांना राज्यस्तरीय महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार

MH 28 News Live, लोणार :  तथागत बहुउद्देश्यीय संस्था, मेहकर यांचे कडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था, व्यक्तिना राज्यस्तरीय महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार 2023 सन्मानपूर्वक प्रदान करून दि. 4 जून रोजी सायंकाळी 4 वा मान्यवरांच्या हस्ते मेहकर येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होलकर यांच्या जयंती दिनी गौरविन्यात येत आहे.या वर्षीचा समाजभूषण पुरस्कार सुप्रसिद्ध प्रबोधनकार, लोककलावन्त, पत्रकार तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गजेंद्र गवई यांना जाहिर करण्यात आला आहे.

गजेंद्र गवई यांनी गेल्या 30 वर्षापासून अविरतपने सम्पूर्ण महाराष्ट्रातिल हजारों गावात विविध कार्यक्रमाच्या माध्यमातुन विविध विषयावर परिवर्तनात्मक प्रबोधन केले आहे. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनाचा जाहिर प्रचार व प्रसार आपल्या लोककलावंतांच्या कलासंचाद्वारे केले आहे. अनेक वृत्तपत्रात प्रासांगिक लेख, कविता लिखान करून अनेक गीत संग्रह प्रसिद्ध आहेत. राष्ट्रीय टिव्ही चैनल लॉर्ड बुद्धा टिव्हीच्या मेरा गाव भारत का संविधान, बोल इंडिया बोल,अपना विहार,संदेश बा भीमा..चलो बुद्ध की ओर,मैत्री संवाद,ई कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन करून 2200 पेक्षा जास्त गावात संविधान जनजागृती केलेली आहे. विविध सामाजिक धम्ममय कार्यक्रम,अभियान,सामूहिक विवाह सोहळे, धम्म परिषदा, विविध पुरस्कार वितरण कार्यक्रम, श्रामनेर शिबिर, जनजागृती प्रबोधन कार्यक्रम, युवा, महिला मेळावे, यशस्वी आयोजन केले आहे.
प्रबोधनकार गजेंद्र गवई यांना यापूर्वी सुद्धा राष्ट्रीय, राज्य,जिल्हा स्तरीय शासनाचे व अनेक संस्था, संघटना यांचे शेकडो पुरस्कार मिळालेले आहेत. सदर पुरस्कार जाहिर झाल्याने राज्यभर सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129