
कुठलीही शिकवणी न लावता शेतकरी पुत्र बनला पोलीस उपनिरीक्षक
MH 28 News Live, चिखली : स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मोठमोठ्या शहरांमध्ये जाऊन महागडे खाजगी शिकवणी वर्ग लावून अभ्यास करण्याचा ट्रेड आता पुढे आला आहे. मात्र, चिखली तालुक्यातील सिंदींहरळी येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील रवींद्र गणेश सुरडकर या तरुणाने पहिल्याच प्रयत्नात पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा पास करून नावलौकिक कमावला. विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या राज्यस्तरीय रँक मध्ये 37 वा नंबर त्याने पटकावला आहे.
स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी ग्रामीण असो की शहरी भागातील मुले मोठमोठ्या शहराकडे जाऊन महागडी खाजगी क्लासेसचे शिकवणी वर्ग लावून तयारी करतात. यामध्ये शिकवणीचा खर्च सोबतच राहण्याचा खर्च असे मिळून लाखो रुपये खर्च होतात. अशा परिस्थितीला बाजूला सारून चिखली तालुक्यातील सिंदी हराळी येथील रवींद्र गणेश सुरडकर या तरुणाने आपल्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाच्या परिस्थितीचा विचार करून चिखली येथेच केवळ एकांतवास मिळावा म्हणून लायब्ररीच्या माध्यमातून घरच्या घरीच तयारी केली. या तयारीच्या बळावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सन 2020 मध्ये घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत महाराष्ट्र राज्यातून 37 रांक मिळवून गुणवत्ता सिद्ध केली आहे.
रवीचे प्राथमिक शिक्षण शिंदीहराळी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये झाले. त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण त्यांने श्री शिवाजी महाविद्यालय चिखली येथे बीएससी बायोलॉजी मधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. सन 2016 मध्ये लग्न झाल्यानंतर रवीने जिद्द पकडली आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. आपल्याला पोलीसच सेवेतच जायचे या ध्येयाने प्रेरित होऊन केवळ एकच परीक्षा देण्याची मनाशी खूणगाठ ठाम करून अवघ्या दोन वर्षाच्या तयारीमध्ये त्यांनी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या पोलीस निरीक्षक पदाच्या पेपर दिला आणि ध्येय पूर्ण केले. स्पर्धा परीक्षेच्या तयारी दरम्यान त्यांने वडिलांना शेतीकामात सुद्धा मदत केल्याची माहिती ‘ समाज नायक ‘ शी बोलताना दिली
रवीच्या या यशामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. पाच जुलै रोजी क्षत्रिय फाउंडेशन चिखली व आधार व्यसनमुक्ती केंद्र चिखलीच्या वतीने रवीचे पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माधवराव गाडेकर, हरिभाऊ परिहार, समाधान गाडेकर, आनंथा गाडेकर, विशाल भागिले इंद्रजीत इंगळे, किशोर सोळंकी, विजय खंडागळे उपस्थित होते
रवीच्या यशातून युवकांनी प्रेरणा घ्यावी – समाधान गाडेकर
सर्वसाधारणपणे सरकारी नोकरी मिळवण्यासाठी वशिला लागतो, किंवा पैसेच लागतात या भ्रमातून बाहेर निघून युवकांनी रवी सुरडकरने सामान्य परिस्थितीतून आणि कुठलाही व्यर्थ खर्च न करता केवळ घरच्या घरी राहून प्रामाणिकपणे व चिकाटीने स्पर्धा परीक्षेची तयारी करून मिळवलेल्या यशातून युवकांनी प्रेरणा घ्यावी असे आवाहन यावेळी पत्रकार समाधान गाडेकर यांनी केले.