♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

१ जानेवारीपासून ‘या’ लोकांचे रेशन कार्ड होणार रद्द; तुमचं काय ते पाहा !

MH 28 News Live : केंद्र सरकार देशातील नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवत असून याचा फायदा करोडो लोकांना होत आहे. गरीब आणि मध्यमवर्गीयांना डोळ्यासमोर ठेवून सरकारने अनेक योजना आणल्या आहेत. ज्याचा आजही अनेक भारतीय लाभ घेत आहेत. पण असं असलं तरी देखील देशात अजूनही अशी परिस्थिती आहे की अनेकांना दोन वेळचे जेवणही मिळत नाही. अशा लोकांसाठीच केंद्र सरकारने रेशन कार्डची सुविधा आणली आहे. शिवाय, कोरोनाच्या काळापासून सर्व पांढऱ्या शिधापत्रिकाधारकांना तांदूळ मोफत देण्यात येत आहे. देशभरातील जवळपास ८० कोटी लोकांना मोफत रेशनचा फायदा होत आहे. त्याचबरोबर या योजनेचा गैरफायदा घेणारेही अनेक लोक आहेत. पात्रता नसतानाही त्यांना रेशन मिळत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. पात्रतेशिवाय रेशन घेणाऱ्यांची शिधापत्रिका रद्द करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.

बनावट शिधापत्रिका वापरून पात्रतेशिवाय मोफत रेशन मिळवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सरकारने १ जानेवारीपासून मुदत निश्चित केली आहे. नवीन वर्षापासून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा लोकांची ओळख ई-केवायसी आणि इतर पद्धतींद्वारे केली जाईल. त्यामुळे १ जानेवारीपासून काही लाख बनावट शिधापत्रिका रद्द होण्याची शक्यता आहे.

सरकारने अलीकडेच जाहीर केले की ते गहू, हरभरा आणि साखर यासह एकूण १० स्वयंपाकघरातील वस्तू लवकरच मोफत वितरीत करण्याची योजना आखत आहेत. त्याचवेळी बनावट कार्डचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळेच सरकारने आधी बनावट कार्ड ओळखण्याचा निर्णय घेतला आहे. अन्यथा खऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळू शकत नाही, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129