
चिखलीच्या गौरीचा गुजराततेत डंका, इयत्ता दहावीच्या परीक्षेत मिळवलेले 99 . 33 टक्के गुण
MH 28 News Live, चिखली : येथील मुळ रहिवासी असलेली व सध्या आपल्या कुटुंबियासह गुजरातमधील सुरत येथे वास्तव्यास असलेली कुमारी गौरी सुनील हिवाळे हिने गुजरात सरकारच्या वतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेत इयत्ता दहावीच्या परीक्षेत मराठी माध्यमातून 99 . 33 टक्के गुण मिळवून मोठे शैक्षणिक यश प्राप्त केले आहे. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कु. गौरी हीने या परीक्षेत 700 पैकी 628 म्हणजे 99 . 33 टक्के गुण प्राप्त केले. कु. गौरी ही स्व. पांडुरंग हिवाळे यांची नात असून अनिल हिवाळे यांची पुतणी तर सुनील हिवाळे यांची मुलगी आहे. तिने मिळवलेल्या या शैक्षणिक यशाबद्दल कु. गौरी हीचे सर्वत्र कौतुक होत आहे.