
‘ तो ‘ विकत होता नायलॉन मांजा, चिखली पोलीसांनी केली कारवाई
MH 28 News Live / चिखली : प्रतिबंधित असलेल्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या एका इसमाविरुद्ध चिखली पोलिसांनी दि. १४ जानेवारी रोजी कारवाई करत ५१० रुपयाचा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत केला आहे.
या संदर्भात थोडक्यात माहिती अशी की, शहरातील गजानन नगर परिसरात अशोक डीजलाल दांडगे हा कापडी पिशवीमध्ये नायलॉन मांजाचे रील घेऊन विकत असल्याची माहिती चिखली पोलिसांना मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे घटनास्थळी जाऊन चिखली पोलिसांनी अशोक दांडगे याला अटक करून त्याच्याकडून ५१० रुपये किमतीच्या नायलॉन मांजाचे रील जप्त करून गुन्हा दाखल केला आहे.