♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

स्व. गोविंदराव शेटे शाळेमध्ये स्कुलबँगचे वितरण माजी नगराध्यक्ष सुहास शेटे यांचा उपक्रम

MH 28 News Live, चिखली : स्व. गोविंदराव शेटे नगरपालिका मराठी प्राथमिक शाळा क्रमांक 2 मध्ये दिनांक 29 जून रोजी प्रवेशोत्सव साजरा झाला. यानिमित्त माजी नगराध्यक्ष सुहास शेटे यांच्या वतीने विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना स्कुलबँगचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

भारतीय जनता पक्षाचे चिखली शहर अध्यक्ष पंडितराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमास शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामकृष्णदादा शेटे, ज्येष्ठ नेते रामदासभाऊ देव्हडे, अंकुशराव पाटील, सुरेंद्र पांडे, भाजपा अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिस भाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

याप्रसंगी केलेल्या रामकृष्णदादा शेटे यांनी या शाळेचे शेटे परिवाराचे असलेले ऋणानुबंध स्पष्ट केले. आपले वडील, माजी नगराध्यक्ष स्व. गोविंदराव शेटे यांचे शिक्षण देखील याचा शाळेत झाले याचा मला अभिमान आहे असे ते म्हणाले. या शाळेतील विद्यार्थ्यांना अधिकाधिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण यापुढे देखील प्रयत्न करू असे आश्वासन शेटे यांनी यावेळी बोलताना दिले. शाळेला रंगरंगोटी करण्यासाठी शेटे कुटुंबाच्या वतीने 51 हजार रुपयांची देणगी यावेळी शाळेला जाहीर करण्यात आली. माजी नगरसेवक रामदासभाऊ देव्हडे यांनी आपल्या भाषणातून शाळेची पटसंख्या वाढविण्यासाठी स्थानिक नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.

अनिस भाई यांनी केलेल्या भाषणात माजी नगराध्यक्ष सुहास शेटे यांनी आपल्या कार्यकाळात शहरातील नगरपालिकेच्या शाळांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मिळवल्याचा आवर्जून उल्लेख केला. याच शाळेमध्ये आपले शिक्षण झाले असून अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी होत असलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत असे मत अनिस भाई यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

श्रीराम नागरी पतसंस्थेचे संचालक कमलकिशोर लांडगे, निवृत्त शिक्षक गजाननराव झाल्टे, युवा नेते शिवराज पाटील, नगरसेवक गोविंद देव्हडे, जाधव सर, भाजप शहर सरचिटणीस युवराज भूसारी, श्याम वाकदकर, यांच्यासह अनेक मान्यवर व स्थानिक प्रतिष्ठित नागरिक लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते यांची उपस्थिती लाभली होती .

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129