♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी सानुग्रह निधी मिळवण्याचा निर्धार; बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीची बैठक अमरावतीत संपन्न

MH 28 News Live / बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीची कार्यकारिणी बैठक दिनांक २७ मे रोजी सकाळी ११.३० वाजता मन रेस्टॉरंट, अमरावती येथे समितीचे जेष्ठ मार्गदर्शक साहेबराव विधळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या बैठकीत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर सानुग्रह निधी मिळावा यासाठी आवश्यक प्रयत्न करण्यावर चर्चा झाली. तसेच मृद व जलसंधारण विभागातील सरळ खरेदीधारक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना निधी मिळावा, यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे ठरविण्यात आले. यानुसार विदर्भातील लोकप्रतिनिधींना निवेदन देण्याचे नियोजन करण्यात आले. बैठकीनंतर समितीच्या शिष्टमंडळाने जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता टाले यांची त्यांच्या अमरावती येथील कार्यालयात भेट घेऊन विविध मागण्यांबाबत निवेदन सादर केले. सानुग्रह निधी व इतर विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

मुख्य अभियंता टाले यांनी यावेळी सांगितले की, ज्या प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध आहे, तेथे वाटप सुरू आहे. उर्वरित प्रकल्पांसाठी शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली असून, तो मिळताच त्याचे वितरण करण्यात येईल. या शिष्टमंडळात साहेबराव विधळे, मनोज तायडे, माणिकराव गंगावणे, विकास राणे, विजय दुर्गे, डॉ. कुटेमाटे, मनिषाताई चक्रणारायण, रवींद्र श्रृंगारे, बाबुसिंगजी पवार, राधेश्याम शिरसाठ, संजय भरदुक, संतोष चक्रणारायण, नरेंद्र पांडव वानखेडे, बाळासाहेब सनखे, आणि मिलींद वानखेडे आदींचा समावेश होता.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129