
बुलढाण्याला दोन वर्षांनंतर मिळाले पूर्णवेळ जिल्हा शल्यचिकित्सक
MH 28 News Live / बुलढाणा : कोरोना काळात चर्चेत आलेल्या बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयाला तब्बल दोन वर्षांनंतर अखेर पूर्णवेळ जिल्हा शल्यचिकित्सक मिळाले आहेत. लातूर जिल्ह्यातील बागळगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांची या पदावर नियुक्ती झाली आहे. ते येत्या सोमवारपासून पदभार स्वीकारणार आहेत.
कोरोना काळात झालेल्या कथित साहित्य खरेदी घोटाळ्यामुळे हे रुग्णालय चर्चेत होते. त्या काळात काही महिन्यांसाठी डॉ. भागवत भुसारी यांनी तात्पुरत्या स्वरूपात सीएस पदाचा कार्यभार सांभाळला होता. आता डॉ. बिराजदार यांच्या नियुक्तीमुळे रुग्णसेवेत सातत्य येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.