
आता शासनाच्या कल्याणकारी योजनांचा कलापथकाद्वारे प्रचार
- MH 28 News Live, बुलडाणा : विद्यमान शासनाला नुकतेच दोन वर्षे पूर्ण झाली आहेत शासनाच्या या यशस्वी कारकीर्द येथील योजना खेडोपाडी व माणसात पोहोचण्यासाठी जिल्हा पातळीवरील तीन कलापथक ९ ते १७ मार्च दरम्यान गावांमध्ये योजनांचा जागर करणार आहेत. महिलांच्या विकास योजना, विद्यार्थी, शेतकऱ्यांच्या योजना ते लोकांच्या भाषेत लोक कलेच्या माध्यमातून सांगितल्यामुळे लोकांच्या पर्यंत पोहचतात.
कोविडमुळे मृत्यू झालेल्या कुटुंबाला शासनाने ५० हजार रुपये अर्थसहाय्यासह शिवभोजन थाळी, महात्मा जोतिराव फुले कर्ज मुक्ती योजना, अतिवृष्टीत झालेल्या पिकाची, शेत जमिनीची नुकसान भरपाई, महिलांच्या कल्याणासाठी राखीव निधी, विद्यार्थी, कास्तकार, दिव्यांगासाठीच्या योजना, रमाई आवास योजना, आवास योजना, पेय जल योजनांची माहिती लोककलेच्या माध्यमातून कलापथक कार्यक्रमांमधून लोकांपर्यंत पोचविण्यात येत आहेत. हे लोकलेचे कार्यक्रम जिल्ह्यातील २१ गावांमध्ये सर्वच तालुक्यात होत आहे.
जिल्ह्यातील बाजारपेठा आणि मोठ्या गावात हा शासकीय योजनांचा जागर होत आहे. शासनाच्या योजना अत्यंत सोप्या भाषेत लोकलेच्या माध्यमातून पोहचतील. हाच उद्देश माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा आहे. त्या उद्देशाला धरून जिल्हा माहिती कार्यालय, बुलडाणा यांनी ह्या कलापथकांच्या माध्यमातून शासकीय योजनांचा जागर जिल्ह्यात करण्यात येत आहे.



