♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

राजुर घाटात अफवेमुळे ट्रकचालकाला बेदम मारहाण; पोलिसांच्या तत्परतेने जीव वाचला

MH 28 N ews Live / बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील राजुर घाट परिसरात सोमवारी सायंकाळी धक्कादायक घटना घडली. एका ट्रकचालकाने ३ ते ४ युवकांना ट्रकखाली चिरडल्याची अफवा पसरताच परिसरातील नागरिक संतप्त झाले. क्षणात जमाव जमला आणि संतापलेल्या लोकांनी ट्रकचालकाला पकडून बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता जमावाने ट्रकच्या काचा फोडून मोठे नुकसान केले.

घटनास्थळी वातावरण तणावपूर्ण झाले असताना पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला. पोलिसांच्या वेळीच केलेल्या कारवाईमुळे जमावाचा रोष आणखी वाढला नाही आणि ट्रकचालकाचा जीव वाचवण्यात यश आले. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून, त्यावरून या प्रकरणाची गंभीरता अधिक वाढली आहे. या घटनेमुळे अफवांच्या जोरावर जमाव हिंसक होऊ शकतो हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, संपूर्ण घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129