♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

सैलानी येथे 33 केव्ही विद्युत उपकेंद्र निर्मीतीला 2 कोटी 64 लक्ष रू. निधी मंजुर राहुल बोंद्रेंच्या प्रयत्नांना यश. उंद्री उपविभाग निर्मीतीला उर्जामंत्री ना.राउत यांची हिरवी झेंडी

MH 28 News Live, चिखली : चिखली विधानसभा मतदार संघातील सैलानी (पिंपळगांव सराई) येथे नव्याने 33केव्ही विद्युत सबस्टेषन उभारणी करीता राहुल बोंद्रे यांनी केेलेल्या मागणी व सततच्या पाठपुराव्याच्या प्रयत्नांना यश आले आहे. राज्याचे ऊर्जा मंत्री नामदार नितीनजी राउत यांनी सैलानी येथील नवीन सबस्टेशन निर्मीती करीता तब्बल 2 कोटी 64 लक्ष रूपयाच्या निधीला मंजुरी दिली आहे. सैलानी येथील कामाला लवकरच प्रत्यक्षात सुरूवात होणार असुन परीसरातील जवळपास 10 हुन अधिक गावातील गावकरी व शेतक-यांना या विद्युत उपकेंद्राचा लाभ होणार आहे. तसेच चिखली विद्युत उपविभाग कार्यालयाचे उंद्री उपविभागात विभाजन करण्याची मागणी तत्कालीन आमदार राहुल बोंद्रे यांनी सन 2017 पासुन लावुन धरली होती. या मागणीचा पाटपुरावा करीत राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राउत यांची मुंबई येथे भेट घेत झालेल्या चर्चेनुसार उंद्री विद्युत उपविभाग निर्मीतीला गती प्राप्त झाल्याचे स्पष्ट केले.

चिखली विधानसभा मतदार संघातील सैलानी दर्गा बुलडाणा जिल्हयासह विदर्भाचेच नव्हे संपुर्ण देशभरातुन दरवर्षी सैलानी येथे यात्रेला येणा-या लाखो भाविक भक्तांचे श्रध्दास्थान आहे. तिर्थक्षेत्र सैलानी दर्गा येथे दररोज येणा-या भक्तांची वाढती संख्या तथा सेैलानी व परीसरातील जवळपास 10 गावांना होणारा विजपुरवठा अपुरा पडत होता, त्यामुळे रायपुर विद्युत उपकेंद्रावर अतिरीक्त विजभार येत असल्याने वारंवार खंडीत होणा-या विजपुरवठयासह भारनियमनाला सुध्दा लगतच्या परीसरातील जवळपास 10 गावातील गावकरी व शेतक-यांना असंख्य अडचणींना तांेड दयावे लागत होते. यापुर्वी रायपूर उपकेंद्रातुन सैलानी व परिसरातील इतर गावांना विद्युत पुरवठा करण्यात येत होता. मात्र विद्युत वाहिन्यांवर वाढलेल्या भार क्षमतेमुळे वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होत असे. या समस्यांकडे ऊर्जा मंत्री राउत यांचे लक्ष वेधीत राहुल बोंद्रे यांनी सेैलानी येथे नवीन विद्युत सबस्टेषन निर्मीतीच्या केेलेल्या मागणीला यश प्राप्त झाले आहे. सेैलानी बाबा सबस्टेशन निर्मीती नंतर स्थापीत क्षमता 5 एमव्हीए राहणार आहे. ( वर्तमान क्षमता 250 ए), फिडरची संख्या 3 (1गावठाण व 2 एजी) समाविष्ठ गावात पिंपळगांव सराई, सैलानी, ढासाळवाडी, घाटनांद्रा, उमरखेड, दुधा, दहिद खुर्द, माळवंडी, देवुपर यासह परीसरातील गावांना पुरेसा विद्युत पुरवठा तसेच परीसरातील शेती सिंचनासाठी योग्य त्या दाबाने विज पुरवठा करणे शक्य होणार आहे. सेैलानी उपकेंद्र निर्मीती करीता तब्बल 2 कोटी 64 लक्ष रूपयाचा निधी खेचुन आनण्यात माजी आमदार राहुल बोंद्रे यांना यश प्राप्त झाले आहे. आता सैलानी येेेथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या सबस्टेशनमुळे एकटया रायपुर विद्युत उपकेंद्रावर येणारा भार विभागल्या जाणार असल्याने गावकरी व शेतक-यांना याचा लाभ मिळणार आहे. परीरातील गावक-यांकडुन समाधान व्यक्त केल्या जात आहे.

चिखली विद्युत उपविभागाचे विभाजन करून उंद्री उपविभाग निर्मीतीला गती

बुलडाणा जिल्हयात चिखली तालुका हा भौगोलीक दृष्टया विखरलेला असुन चिखली उपविभागामध्ये ग्राहक संख्या जास्त असुन तालुका हा कृषी व औद्योगिक दृष्टया अग्रेसर आहे. मोठया संख्येने असलेल्या ग्राहकांना सेवा देत असतांना महावितरण अधिकारी व कर्मचारी वर्गाला विविध अडचणींना सामोरे जावे लागते. परीणामी विद्युत ग्राहक असलेल्या नागरीकांसह शेतक-यांनाही वारंवार खंडीत होणा-या विज पुरवठयामुळे अनेक अडचणींना तोंड दयावे लागत होते. ही समस्या सोडविण्याकरीता दि. 25 एप्रिल 2017 रोजी राज्याचे तत्कालीन उर्जा मंत्री चंद्रषेखर बावनकुळे यांना हया प्रष्नी निवेदन देत माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी सतत पाठपुरावा केला होता हे उल्लेखणीय. आज दिनांक 28 एप्रिल रोजी राहुल बोंद्रे यांनी मुंबई येथे ऊर्जा मंत्री नितीन राउत यांची भेट घेवुन उंद्री विद्युत उपकेंद्र निर्मीती बाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी उंद्री उपकेंद्र निर्मीतीला गती देणार असल्याचे नामदार राउत यांनी आश्वासन दिले. त्यामुळे उंद्री विद्युत उपकेंद्र निर्मीला गती आल्याने या परीसरातील नागरीक व शेतक-यांची वारंवार उद्भवना-या समस्येतुन सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129