♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

मिशन वात्सल्यं च्या सदस्यंपदी उध्दवं थुट्टे पाटील यांची नियुक्ती

MH 28 News Live, चिखली : प्रगतीशिल शेतकरी तथा पत्रकार उध्दवं थुट्टे पाटील यांची शासनाच्या तालुकास्तंरिय मिशन वात्सल्य समितीमध्ये अशासकिय सदस्यं म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

कोविड-१९ या संसर्गजन्य प्रादुर्भाव मागिल दोन वर्षापासुन मोठया प्रमाणात सुरु होता. कोविड १९ पहिल्या व दुस-या लाटेमध्ये अनेक नागरीकांचे निधन झाले आहे. अनेक ठिकाणी एकाच कुटूंबातील आई आणि वडिल अशा दोन्ही पालकांचे निधन झाल्याने ० ते १८ वयोगटातील बालके अनाथ झाली आहेत. तर घरातील कर्त्यापुरुषाचे निधन होवुन एकल/विधवा महिलांचे पुनर्वसन करुन त्यांचा आर्थिक व सामाजिक विकास साधुन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे तसेच त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ उपलब्ध व्हावा यासाठी राबविण्यात येणा-या मिशन वात्सल्य या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शासन निर्णयानुसार तालुकास्तरीय समन्वय गठित करण्यात आली आहे.
या समितीमध्ये स्वंयसेवी संस्थेचा प्रतिनिधी म्हणुन उध्दवं थुट्टे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आपल्या निवडीचे श्रेय ते पालकमंत्री डॉ. राजेंद्रं शिंगणे यांना देतात. उध्दवं थुट्टे पाटील यांच्या निवडीचे सर्व स्तरातुन स्वागत होत आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129