
डॉ. सत्येंद्र भुसारी यांचा सामाजिक योगदानाचा आदर्श पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी : राहुल बोंद्रे चिखली काँग्रेसच्या वतीने प्रथम पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
MH 28 News Live / चिखली : काही व्यक्तिमत्त्वे काळाच्या पडद्याआड गेल्यानंतरही आपल्या कार्याच्या आणि विचारांच्या माध्यमातून समाजाच्या स्मरणात कायम राहतात. शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी कार्यरत राहिलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय डॉ. सत्येंद्र भुसारी हे पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी असणारे व्यक्तिमत्त्व आहे, असे गौरवोद्गार माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी काढले.
गुरुवार १२ नोव्हेंबर रोजी लोकनेते तथा माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांच्या जनसेवा कार्यालयात चिखली शहर काँग्रेसच्या वतीने स्वर्गीय डॉ. सत्येंद्र भुसारी यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या सामाजिक आणि सार्वजनिक जीवनातील योगदानाचे स्मरण केले. दरम्यान पांडुरंग पाटील, डॉ. संतोष वानखेडे, रामभाऊ जाधव, समाधान सुपेकर, विष्णू पाटील कुळसुंदर काशिनाथप्पा बोन्द्रे, अशोकराव पडघान, दीपक देशमाने व गोपाल देव्हढे यांनी स्व.डॉक्टर भुसारी यांच्या कार्य जिवनावर प्रकाश टाकत आदरंजरली अर्पण केली. समाजातील विविध घटकांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करताना त्यांनी लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची आणि गरजूंना मदतीचा हात देण्याची भूमिका जपली. त्यामुळेच त्यांचे कार्य केवळ पदापुरते मर्यादित न राहता लोकांच्या मनात कायमचे स्थान निर्माण करणारे ठरले. आज डॉ. सत्येंद्र भुसारी आपल्यात नसले तरी त्यांनी जपलेली सामाजिक बांधिलकी, शेतकऱ्यांप्रती असलेली तळमळ आणि माणुसकीची मूल्ये नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांनी निर्माण केलेला आदर्श पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी लोकनेते तथा माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे, तालुका अध्यक्ष रामभाऊ जाधव, शहर अध्यक्ष गोपाल देव्हढे, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास वाघमारे, शहर अध्यक्ष शेख जाकीर भाई, बाजार समितीचे सभापती समाधान सुपेकर, माजी सभापती डॉक्टर संतोष वानखेडे, विष्णू पाटील कुळसुंदर, पांडुरंग पाटील भुतेकर, अशोकराव पासघान, दीपक देशमाने, काशिनाथअप्पा बोन्द्रे, अतहर काझी, नगरसेवक गोकुळ शिंगणे, पुरुषोत्तम वायाळ सर, आनंद बोन्द्रे, शिवनारायण म्हस्के, श्याम पठाडे, भारत म्हस्के, भास्कर चांदोरे, प्रदीप पचेरवालं, रामभाऊ भुसारी, समाधान आकाल, डॉक्टर संजय घुगे, शेख खैरू भाई, सरपंच चेतन म्हस्के, प्रकाश चव्हाण, रवींद्र भुसारी, देवेंद्र भुसारी, एन.टी. भुसारी, रवींद्र सोनटक्के, मनोज भुतेकर, मनोज शर्मा, राजू वाघमारे, समाधान हिवाळे, संजय गायकवाड, भागवत कुटे, समाधान म्हस्के, अयान जमदार, साहेबराव अंभोरे, भगवान गायकवाड, संदीप नरोटे, गोपाल चव्हाण, पत्रकार रमेश कणखर, व्यंकटेश रिंढे, शेख इलीयास, सैयद शोराब, शरद खपके, प्रवीण पाटील, अर्जुन गवई यांची उपस्थिती होती.
डॉ. भुसारी हे शेतकरी प्रश्नांची जाण आणि भान असलेले व्यक्तीमत्व
डॉ. भुसारी यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत काम केले. शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा असून त्याच्या प्रश्नांची जाण असणे आणि त्याच्या हितासाठी संवेदनशीलतेने काम करणे हीच खरी लोकसेवा आहे, ही भूमिका त्यांच्या कार्यातून दिसून येत होती. पदापेक्षा लोकांचा विश्वास, प्रतिष्ठेपेक्षा माणुसकी आणि राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.



