
‘ द कश्मीर फाइल्स ‘ ची बुलडाण्यातील तरुणाईला प्रतीक्षा. चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी थिएटर मालकाला दिले निवेदन
MH 28 News Live, बुलडाणा : काश्मिरी हिंदू पंडित अन्वर नव्वदच्या दशकामध्ये झालेल्या अनन्वित अत्याचार अन् वर आधारित असलेला व सत्य घटना सत्य दाहक वास्तव मांडणारा द काश्मीर व्हाईस हा चित्रपट सध्या देशभर प्रचंड गाजतोय. काही ठिकाणी विशिष्ट विचारसरणीच्या लोकांकडून या चित्रपटाला जाणीवपूर्वक विरोधक होत असताना देशभक्तीने सळसळणारे तरुण मात्र या चित्रपटाकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. याच धर्तीवर बुलडाणा शहरातील तरुणाई पुढे आली असून त्यांनी ए. आर. डी. मॉल या थिएटरच्या संचालकांकडे द कश्मीर हा चित्रपट लवकरात लवकर आपल्या चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित करावा अशी मागणी करणारे निवेदन दि. १४ मार्च रोजी सादर केले
सन १९९० च्या दशकात काश्मिरी हिंदुवर झालेल्या अत्याचाराचे वास्तव्य मांडणारा ‘द कश्मिर फाईल्स’ नामक चित्रपट संपुर्ण जगभरात प्रदर्शीत झालेला असुन नागरीकांकडुन चांगला उत्स्फुत प्रतिसाद मिळत आहे. सदर चित्रपट हा आपल्या बुलडाणातील चित्रपटगृहात लवकरात लवकर प्रदर्शीत करावा, अशी मागणी समस्त स्थानिक व जिल्हयातील नागरीकांकडुन केली जात आहे. याची कृपया आपण दखल घ्यावी. तसेच हा चित्रपट आपल्या सिनेमागृहात प्रदर्शीत करावा असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
उकर्ष डाफणे, अजीत गुळवे, निलेश मुठ्ठे, अंकेश मुट्ठे, विनायक भाग्यवंत, संतोष सोनुने, सोनू बाहेकर यांच्यासह श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, विश्वहिंदु परिषद व बजरंग दल या संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या असलेल्या या निवेदनाची दखल घेऊन ए. आर. डी. माँलचे संचालक देशलहरा द कश्मीर फाइल्स हा चित्रपट आपल्या थिएटरमध्ये कधी प्रदर्शित करणार याची वाट आता बुलडाणेकर पाहात आहेत.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button