
स्वस्त धान्य दुकानदारांकडून ईपॉस मशीन शासनाकडे जमा राशन वाटप न करण्याचा इशारा; लोणारमध्ये दिले निवेदन
MH 28 News Live, लोणार : तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी कालबाह्य झालेल्या तसेच नादुरुस्त ई पाॅस मशीन शासनाकडे जमा करून जोपर्यंत ह्या नादुरुस्त मशीन दुरुस्त करण्यात येत नाही तोपर्यंत धान्यवाटप करणार नसल्याचा इशारा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांकडून तहसीलदार सैफन नदाफ यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.
शासनाकडून राशनच्या मालाचे वाटप ऑनलाइन पद्धतीने व्हावे त्यामध्ये सुसूत्रता यावी म्हणून महाराष्ट्रातील स्वस्त धान्य दुकानदारांना धान्याचे वाटप करण्यासाठी ईपाॅस मशीन देण्यात आलेल्या आहेत परंतु सदर मशीन मध्ये सातत्याने तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे राशन धारकांना धान्य वाटप करण्यामध्ये स्वत धान्य दुकानदारांना अडचणी निर्माण होत आहे ज्या दुकानदाराकडे धान्यसाठा उपलब्ध आहे त्या दुकानदाकडील मशीनवर धान्य उपलब्ध नाही असे दाखविते तर ज्या दुकानदारांना धान्य मिळाले नाही त्या दुकानवर ई-पाॅस मशीन धान्य उपलब्ध असल्याचे दाखवते या प्रकारामुळे स्वस्त धान्य दुकानदार त्रस्त झाले आहेत.
धान्य उपलब्ध असताना आम्हाला धान्य का देत नाही म्हणून राशन कार्ड धारकांच्या रोषाला दुकानदारांना सामोरे जावे लागत आहे जोपर्यंत कालबाह्य नादुरुस्त पॉस मशीन शासन दुरुस्त करून देत नाही तोपर्यंत तालुक्यातील एकही दुकानदार धान्यांचे वाटप करणार नाही असा इशारा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार यांनी दिला आहे
लोणार पंचायत समिती कार्यालयापासून स्वस्त धान्य दुकानदारांनी एकञ येवुन ई-पाॅस मशीन हातात घेऊन तहसील कार्यालया पर्यंत मोर्चा काढला.
यावेळी मोर्चामध्ये स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष भगवान कोकाटे उपाध्यक्ष डॉ. अनिल मापारी सचिव संजय पवार कार्याध्यक्ष हाजी एम ए नसीम, श्रीराम आघाव, संतोष आघाव, विलास दराडे, संतोष रुणवाल, रामदास तनपुरे, राजू धुमाळ, तानाजी अंभोरे, गणेश मापारी, भुरान चौधरी, सतीश तेजनकर, योगेश मुंढे यांच्यासह तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार यावेळी हजर होते.



