♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

चिखली अर्बन बँकेच्या वतीने महिला बचत गटांना 1 कोटी 23 लाख 80 हजार रुपये कर्जपुरवठा

MH 28 News Live, चिखली : दि चिखली अर्बन बँकेच्या चिखली शाखेच्या वतीने 14 बचतगटाच्या 172 महिलांना 1 कोटी 23 लाख 80 हजार रुपये कर्जपुरवठा बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.

यावेळी बोलतांना बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त म्हणाले, चिखली बँक ग्रामीण भागातील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून कर्जपुरवठा उपलब्ध करून देत आहे. महिला बचतगटाची नोंदणी करून केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देत ग्रामीण भागात उद्योग व्यवसाय उभे करून रोजगार निर्मिती करण्याची इच्छा व्यक्त केली व 10 हजार महिलांना बचतगटाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कर्जवाटप करण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी बोलतांना बँकेचे संचालक मनोहर खडके म्हणाले. चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांच्या संकल्पनेतून महिला बचत गट स्थापन करून त्यांना अल्पदरात कर्ज देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार असंख्य महिलांना बँकेने कर्जवाटप करून आर्थिक सक्षम करण्याकडे पाऊल उचलले आहे. यापुढे या संपूर्ण गटांनी बँकेकडून कमी व्याजदराने कर्ज घेऊन विविध उद्योग सुरू करावे असे आवाहन केले. यासाठी चिखली अर्बन बँक या बचतगटांना सर्वोतोपरी मार्गदर्शन करेल आणि महिलांनी सुरू केलेल्या उदयोगांना चालना देऊन महिलांना आर्थिक सक्षम करणार असल्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जयश्री बोराडे ( मुख्याधिकारी, नगरपरिषद, शेगाव ), डॉ. रवींद्र बोराडे, डॉ. आशुतोष गुप्त, बँकेचे संचालक मनोहर खडके, राजेश व्यवहारे, सुनिताताई भालेराव, अर्चनाताई खबूतरे, बँकेचे सरव्यवस्थापक संजय भंगिरे, शाखाधिकारी सतीश जोशी उपस्थित होते. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129