♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

सरकारी महामंडळे व समित्यांच्या नियुक्त्या नव्या सरकारने केल्या रद्द

MH 28 News Live : महाविकास आघाडीने घेतलेले निर्णय बदलण्याचा सपाटा शिंदे-फडणवीस सरकारने लावल्यानंतर आता विविध शासकीय महामंडळे, विविध समित्या व प्राधिकरणावर नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत.

याबाबतचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी काढलेले आदेश आज सदस्यांना पाठविण्यात आले आहेत. मात्र सिद्धिविनायक देवस्थान व शिर्डी संस्थान यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.

सरकारने काढलेल्या आदेशानुसार मागील सरकारच्या काळातील राज्य सरकारच्या उपक्रमांमधील नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. याची अंमलबजावणी सात दिवसांत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना देण्यात आलेल्या पोलीस संरक्षणाबाबत फेरआढावा घेण्यात येऊन त्यानंतर त्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

1 एप्रिल 2022 पासून जिल्हा वार्षिक योजना, राज्यस्तरीय योजना, आदिवासी विकास उपयोजना तसेच विशेष घटक या व अन्य योजनांमध्ये मंजूर झालेल्या, पण निविदा न काढलेल्या कामांच्या अंमलबजावणीस शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिली.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129