♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

आत्महत्या – कर्जबाजारीपणाला कंटाळून दे माळी येथे 42 वर्षीय व्यक्तीने उचलले टोकाचे पाऊल

MH 28 News Live, मेहकर : तालुक्यातील देऊळगाव माळी येथे अतिशय धक्कादायक घटना घडली. कर्जबाजारीपणाला कंटाळून येथील 42 वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.


सविस्तर वृत्त असे की, दि. 29 डिसेंबर रोजी घरी कोणीही नसताना सुमारे दुपारी बारा ते दोन वाजताच्या दरम्यान गणेश नामदेव मगर वय वर्ष 42 या व्यक्तीने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या प्राप्त प्राथमिक माहितीनुसार गणेश मगर यांच्याकडे चार चाकी मालवाहू वाहन होते. त्यांच्याकडे फायनान्स कंपनीची हप्ते थकलेले होते.तसेच इतरही उसने घेतलेले पैसे कुठून फेडणार या विवंचनेमध्ये असताना त्यांनी टोकाचे पाऊल उचलले व राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पाठीमागे पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, आई वडील, असा फार मोठा आप्तपरिवार आहे. दिनांक 30 डिसेंबर रोजी शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील घटनेचा तपास मेहकर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार निर्मला परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय नागरे साहेब, मांटे साहेब, बीट जामदार अशोक मस्के, रिंडे साहेब करीत आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129