♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट. अखेर ते ११ संचालक अपात्र घोषित जिल्हा उपनिबंधकांचा निर्णय

MH 28 News Live, चिखली : उमेदवारी अर्ज माघारी घेण्याला तीन दिवस उरले असताना चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट आला आहे. या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उभे असलेल्या ११ माजी संचालकांचे उमेदवारी अर्ज जिल्हा उपनिबंधक ( सहकारी संस्था ) यांनी दि. १७ एप्रिल रोजी बाद केल्यामुळे सदर निवडणुकीमध्ये आता राजकारण तापले असल्याचे चिखली तालुक्यात दिसत आहे.

चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत दि. २० एप्रिल रोजी संपत आहे. तथापि निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार यांनी दि. ५ एप्रिल रोजी म्हणजे उमेदवारी अर्ज छाननी प्रसंगी विष्णू पुरुषोत्तम कुळसुंदर रा. तोरणवाडा, ता. चिखली,
सत्येंद्र कृष्णराव भुसारी, रा. भोरसा भोरसी, ता. चिखली, रुपराव तुकाराम सावळे, रा. गांगलगाव, ता. चिखली, ईश्वरराव भीमराव इंगळे, रा. उत्रादा (पेठ) ता. चिखली, विजय दिनकरराव शेजोळ, रा. सावंगी ता. चिखली, संजय माणिकराव गाडेकर, रा. तेल्हारा, ता. चिखली, मनोज पांडुरंग खेडेकर, रा. खंत्री खेडेकर, चिखली, गजानन तुळशिराम पवार, रा. इंदिरा नगर, चिखली, ता. चिखली, काशिनाथ विश्वंभरआमा बाँडे, रा. जयस्तंभ चौक, चिखली, सुमनबाई मधुकर म्हस्के, रा. पांढरदेव, ता. चिखली आणि गजानन शंकरराव मोरे, रा. दिवठाणा, ता. चिखली या ११ माजी संचालकांचे उमेदवारी अर्ज बाद केले होते. कैलास हरीराम भादुपोता ( शर्मा ) यांनी वरील ११ उमेदवारांच्या विरोधात घेतलेल्या आक्षेपांमुळे सदर उमेदवारी अर्ज बाद करण्यात आले होते.

दरम्यान तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घेतलेल्या त्या निर्णयाविरोधात ११ जणांनी एकाच वेळी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, बुलढाणा तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अपिल दाखल केले होते. यामध्ये जिल्हा उपनिबंधक ( सहकारी संस्था ) यांना आपले उमेदवारी अर्ज बाद करण्याचा अधिकार नसल्याचा दावा करण्यात आला होता. न्यायालयाने त्यावर कोणताही ठोस निर्णय न देता जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सदर प्रकरण अंतिम निर्णयासाठी सोपवले होते. त्यानुसार जिल्हा उपनिबंधकांनी आज निर्णय घेतला.

शेवटी संविधानच सरस ठरले
जिल्हा उपनिबंधक ( सहकारी संस्था ) यांनी आज या प्रकरणी आपला अंतिम निर्णय जाहीर केला. यानुसार कैलास शर्मा यांनी आक्षेप घेतलेल्या ११ माजी संचालकांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपविधी आणि नियमांचे उल्लंघन केल्याचा व निधीचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवून सर्व ११ उमेदवारांना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवले आहे. मधल्या काळात अपात्र घोषित झालेल्या उमेदवारांच्या समर्थनार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन सदर उमेदवारांना अपात्र घोषित करणे हे संविधानाच्या व लोकशाहीच्या विरोधात असून भारतीय जनता पक्ष या मार्गाने हुकुमशाही लादू पाहात असल्याचा आरोप केला होता. परंतु, आजच्या या निर्णयामुळे संविधानातील कायदे व नियम हेच श्रेष्ठ असून शेवटी संविधानच सरस ठरले झाला असे म्हणावे लागेल.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129