भेंडवळची भविष्यवाणी अक्षय्य तृतीयेला
MH 28 News Live, जळगाव जामोद : बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ परिसरातील शेतकरी दावा करतात की, ३५० वर्षांपूर्वीपासून अक्षय तृतीयेला ही प्रथा जोपासली जाते. या प्रथेला शेतकऱ्यांची मोठी मान्यता असते. या मांडणीतून जाहीर केलेल्या अंदाजाबद्दल शेतकऱ्यांमंध्ये मोठी उत्सुकता असते. राज्यातील शेतकऱ्यांचा या प्रथेवर मोठा विश्वास असतो. अशी ही घट मांडणी येत्या शनिवारी म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी सायंकाळी जिल्ह्यातील भेंडवळ गावी होणार आहे.
यंदा किती पाऊस पडणार याची भविष्यवाणी या माध्यमातून व्यक्त केली जाते. ३५० वर्षापूर्वी या भागातील तपस्वी चंद्रभान महाराज यांनी ही परंपरा सुरू केली. ही प्रथा आजच्या काळात त्यांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज हे निसर्गातील घडामोडींचे निरीक्षण करून अंदाज जाहीर करत असतात. गेल्या तीन वर्षात देशावर कोरोनासारख्या भयंकर संकटाने आक्रमण केले होते. त्यामुळे याठिकाणी राज्यभरातून शेतकरी येऊ शकले नाहीत.
वैज्ञानिक आधार नसला तरी शेतकऱ्यांचा विश्वास
मात्र आता येणाऱ्या वर्षभरात नेमकी पावसाची, पिकांची, देशातील राजकीय स्थिती काय असणार आहे ? हे या अंदाजानुसार जाणून घेण्यासाठी या वर्षी शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. हे अंदाज किती खरे ठरतात. यावर शंका असली, तरी या प्रथेला वैज्ञानिक आधार नसला तरी मात्र शेतकरी यावर मोठा विश्वास ठेवतात. आपल्या वर्षभराचे शेतीविषयक नियोजन या प्रथेनुसार करतात, हे विशेष.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button