
ग्रंथालय भारती’चा दिवाळी अंक – प्रकाशनपूर्व २०% सवलतीत उपलब्ध
MH 28 News Live / चिखली : या वर्षीच्या दिवाळीत ग्रंथालय भारती वाचकांसाठी ज्ञान, संस्कृती आणि सर्जनशीलतेचा संगम असलेला एक दर्जेदार दिवाळी अंक घेऊन येत आहे. भारतीय ज्ञान परंपरा, पर्यावरण संवर्धन, कुटुंब प्रबोधन, नाट्यधारित लेखन, प्राचीन भाषांची ओळख, आत्मनिर्भरता, समरसता, कविता संग्रह, शब्दकोडे, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणारे अनेक विषय या अंकात समाविष्ट करण्यात आले आहेत.

संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या पुण्यस्मरण वर्षानिमित्त आणि वंदे मातरम् गीताच्या १५० वर्ष पूर्णत्वास समर्पित हा विशेष अंक आकर्षक मुखपृष्ठ आणि रचनात्मक मांडणीसह सजला आहे. “या दिवाळीत प्रत्येक घरात वाचनाचा दिवा पेटवणारा अंक घ्या आणि ज्ञानसोहळ्याचा आनंद लुटा,” असे ग्रंथालय भारतीचे कार्याध्यक्ष श्री. रविंद्र पांडे यांनी सांगितले.
२०० रुपयांचा हा दिवाळी अंक प्रकाशनपूर्व नोंदणीवर २० टक्के सवलतीत उपलब्ध आहे. नोंदणीसाठी 9325457052 या क्रमांकावर संपर्क साधावा. या क्रमांकावर फोन पे किंवा गुगल पे द्वारे वर्गणी पाठवण्याची सोयही उपलब्ध आहे. पेमेंट केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट, नाव आणि पूर्ण पत्ता (पिनकोडसह) पाठवावा. वर्गणी भरल्यानंतर अंक ४ ते ५ दिवसांत घरपोच मिळेल.

अधिक माहितीसाठी संपर्क:
📞 श्री. रविंद्र पांडे – कार्याध्यक्ष, ग्रंथालय भारती (9325457052)
📞 श्री. सुनील वायाळ – सचिव, ग्रंथालय भारती (97630 89837)



