♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

डॉ. राजेंद्र शिंगणे जिल्हा बँकेवर अविरोध झाल्याचा जल्लोष

MH 28 News Live / देऊळगाव राजा : बुलढाणा जिल्हा केंद्रीय बँकेच्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवाराने माघार घेतल्याने माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांची अविरोध निवड झाल्याचा कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी करून जल्लोष साजरा केला.

बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या निवडणुकीत सिंदखेडराजा मतदार संघात प्रतिस्पर्धी उमेदवार दत्तात्रेय विनायकराव देशमुख यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. अन् जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे हे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अविरोध निवडून आले. त्यांच्या या विजयाचा जल्लोष म्हणून स्थानिक बस स्थानक चौकात कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी करून जल्लोष साजरा केला.यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश इंगळे, युवा नेते गणेश सवडे, सुधाकर म्हस्के, गजानन चेके,हाजी शौकत हुसेन,गणेश बुरकुल, संदीप नागरे,अर्जुन आंधळे,शरद डोईफोडे,विलास खराट,शिवाजीराव कोल्हे,मंदाताई शिंगणे,विष्णू रामाने,शेषराव कोल्हे,रामेश्वर रामाने, भरत दंदाले, गणेश दंदाले,अर्पित मिनासे,हनिफ शाह,संजय दहातोंडे, जहीर पठाण,रमेश नरोडे, अशोक शेळके, शालिग्राम डोईफोडे, संजय खरात, आत्माराम चित्ते, दत्ता टकले, अनंत देशमुख आदींची उपस्थिती होती.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129