
पत्नीला अमानुष मारहान प्रकरणी पतीसह चौघाविरुद्ध गुन्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापकाचा प्रताप
MH 28 News Live / देऊळगाव राजा : जिल्ह्यातील देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून पतीसह चौघांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद (NCR क्र. 0481/2026) करण्यात आली आहे. ही नोंद २ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आली असून, तक्रारीनुसार मारहाण, शिवीगाळ, धमकी तसेच संशयावरून वाद झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, ती देऊळगाव राजा येथील रहिवासी असून तिचे पती अमडापूर येथील उर्दू जिल्हा परिषद कन्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून नोकरी करतात. कुटुंबात तीन मुली व एक मुलगा असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
दि.२ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे ३ वाजता पती घरी आल्यानंतर कौटुंबिक कारणावरून वाद झाला.पती वरील संशयाच्या कारणावरून पतीसह इतर व्यक्तींनी शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच तक्रारदार व तिच्या भावाला धमकी दिल्याचेही नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी पती अब्दुल सईद अब्दुल हमीद रा.आदर्श कॉलनी देऊळगांव राजा, सासरे अब्दुल हमीद शेख मोहम्मद, सासु शकीला बी अब्दुल हमीद, दिर अब्दुल आहद अब्दुल हमीद, यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 मधील कलम 115(2), 352, 351(2) आणि 351(3) अंतर्गत NCR नोंदविल्याचे आदखल पत्र गुन्हा नोदविन्यात आला आहे.



