♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

तहसीलदारांच्या वाहनावर टिपर धडकवणारा वाळूमाफिया गजाआड; न्यायालयाने सुनावली दोन दिवसाची पोलिस कोठडी

MH 28 News Live / देऊळगावराजा : तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या वाहनावर टिपर चढवून त्यांच्या व सहकाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण केल्याच्या गंभीर प्रकरणातील फरार आरोपी हर्षल मनोहर अंभोरे (वय २३, रा. एकलारा, ता. चिखली) याला अंढेरा पोलिसांनी अखेर जेरबंद केले आहे. आरोपीला आज, दि. ४ सप्टेंबर, शुक्रवारी देऊळगाव राजा न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला दि. ५ सप्टेंबर, शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणात आरोपी दीर्घकाळ फरार राहिल्याने विविध स्तरावर संताप व्यक्त करण्यात आला होता. महसूल अधिकारी-कर्मचारी व विविध संघटनांनी आरोपीच्या अटकेसाठी निवेदने आणि आंदोलनाचा मार्ग स्वीकारला होता. दरम्यान जिल्हा पोलिसांच्या आश्वासनानंतर महसूल कर्मचारी संघटनेने बे मुदत रजा आंदोलन मागे घेतले होते.अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याने या प्रकरणाच्या तपासाला आता वेग येण्याची शक्यता आहे.

पोलिस कोठडीत आरोपीकडून घटनेमागील संपूर्ण घटनाक्रम, अवैध वाळू वाहतुकीशी संबंधित बाबी तसेच आरोपीला फरार राहण्यासाठी कोणी मदत केली का, याबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर येण्याची शक्यता आहे. तहसीलदारांच्या वाहनावर टिपर चढवून सरकारी अधिकाऱ्यांच्या जीवाशी खेळण्याच्या आरोपातील आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आल्याने या गंभीर प्रकरणातील आणखी धक्कादायक बाबी उघड होतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129