
चिखलीत संपन्न झाला चैत्र पाडवा पहाट
MH 28 News Live, चिखली : येशील विवेकानंद शिकवणी वर्षाचा परिवाराने आयोजित केलेला ‘चैत्रपाड़वा पहाट’ हा प्रभात संगीत सोहळा अतिशय सुंदरतेने सपन्न झाला. दोन वर्षापासून रसिक या कार्यक्रमाची वाट पहात होते.
‘चैत्र पाडवा पहार’ च्या चौदाव्या पुष्पात वैष्णवी रिंटढे, वैशाली आराख आणि करणसिंह राजपूत या जव्या दमाच्या कलाकारांनी आपल्या आवाजाने रसिकांना खिळवून ठेवले होते.
संगीत अलंकाराचे शिक्षण घेत असलेल्या वैष्णवी कु रिंढे हिने बड़ा ख्याल, छोटा ख्याल आणि तराणा गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर टाळी वाजवावी गुढी उभारावी, संत कबीर यांची रचना, सुनो बाबा दुनिया में मौज बुरी है, कानडा राजा पंढरीचा, घागर घेवून घागर घेवून इत्यादी सुंदर गाणी वैष्णवीने सादर केली. सुर निरागस हो गणपती, आणि ” अंदाज आरशाचा वाटे खरा असावा ” ही दोन अतीर गाणी करणसिंह राजपूत यांनी गायली. त्यानंतर तळाव्यावर मेंदीचा अजूनी रंग ओला, ही कशानं धुंदी आली, इशारो इसरो मे, ही अवीट गाणी करणसींग राजपूत आणि वैशाली आराख याच्या गोड गळ्यातून उत्तरली. नंतर वैशालीने केतकीच्या बनी, केव्हातरी पहाटे सुंदर ते ध्यान ही गाणी गाऊन रासिकांची मने जिंकली.
सूत्रसंचालक चंद्रशेखर जोशी यांच्या ” वासुदेव आला रे वासुदेव आला “, अतीश राजपूत यांची ढोलकी आणि रमेश कोल्हे यांच्या बासरीने पेक्षकांची दाद मिळवली. स्व. लतादिदींना श्रद्धांजली म्हणून “अखेरचा हा तुला दंडवत” या वैशालीच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विवेकानंद शिकवणी परिवारातील सदस्यांनी बरासचा खर्च उचलला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय नंदु वाघ यांनी केला तर आभार प्रदर्शन भागवत इरतकर सर यांनी केले.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button