♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

त्वरा करा, शेवटचे १५ दिवस उरले. आधार – पँन लिंक नसेल तर येऊ शकतात ह्या अडचणी

MH 28 News Live : आधार कार्ड आणि पॅन कार्ड परस्परांशी लिंक करण्यासाठी केंद्र सरकारने यापूर्वी अनेकदा मुदतवाढ दिली होती. यासाठी शेवटची तारीख म्हणून ३१ मार्च घोषीत केली होती. पण आता शासनाने दिलेली तारीख संपण्यात काहीच अवधी राहीला असून ज्यांनी आधार – पॅन लिंक केला नसेल त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.

आधार – पॅन लिंक केला नसल्यास टॅक्स जास्त कापला जाणारच आहे. त्याचबरोबर बँकिंगशी संबंधीत, डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या पेमेंटमध्ये समस्या ही येऊ शकते. तर ऑनलाइन व्यवहारातही अडचणी येऊ शकतात. ही बाब एटीएममधून पैसे काढताना सुध्दा त्रासदायक ठरू शकत. कारण ३१ मार्च ही मुदत पुन्हा वाढवली जाणार नाही.

आयकर कायद्यातील १३९ AA तरतुदीनुसार ज्या लोकांनी १ जुलै २०१७ पर्यंत पॅन कार्ड बनवले आहे आणि ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे, त्यांनी आपला आधार-पॅन लिंक करायचा आहे. गेल्या तीन वर्षांत सीबीडीटीने आधार आणि पॅन लिंक करण्याची तारीख अनेक वेळा वाढवली. मात्र अनेक जनांनी पुन्हा तारीख वाढते म्हणत पॅन आणि आधार लिंक केलेले नाही. मात्र आयकर कायद्यातील १३९ AA तरतुदीनुसार जर निर्धारित तारखेपर्यंत आधार-पॅन लिंक न केल्यास पॅन निरुपयोगी होईल. त्यामुळे आर्थिक कामात पॅनची कोणतीही भूमिका राहणार नाही. तर जे नवीन पॅनसाठी घेणार आहेत त्यांना आधार कार्ड देणे गरजेचे आहे.

जर PAN आधारशी लिंक नसेल, तर पॅन निरुपयोगी होईल. तर IT रिटर्न भरताना करदात्यांना त्यांचे पॅन कार्ड तपशील द्यावे लागतील. जर करदात्याने दिलेला पॅन अवैध झाला तर आयकर भरताना जादाची रक्कम भरावी लागेल. जी आयकर कलम २०६एए नुसार सर्वाधिक २० टक्के दराने असेल. त्यामुळे मुदत ठेवी, लाभांश आणि इतर उत्पन्नावरील व्याजावर याचा परिणाम होईल.

डिफॉल्टरवर १० हजार रुपयांचा दंड

आयकर कायद्याच्या कलम २७२ B नुसार, एखादी व्यक्ती प्रत्येक वेळी पॅन कार्ड तपशील देण्यास अपयशी ठरल्यास त्याला डिफॉल्टरवर १० हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. हा दंड इतर शुल्कांव्यतिरिक्त असेल.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129