♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

खूशखबर… पोस्टातील खातेदारांना आता काढता येणार ATM द्वारे पैसे, करता येईल आँनलाईन मनी ट्रान्सफर

MH 28 News Live, बुलडाणा : या २०२२ वर्षामध्ये देशातील सर्व म्हणजे दीड लाख लाख पोस्ट ऑफीसेस १०० टक्के कोअर बँकिंग प्रणालीवर येणार आहेत. त्यामुळे पोस्टात बचत खाते असणाऱ्या खातेदारांना आता नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, एटीएमद्वारे खात्यांमध्ये व्यवहार करणे शक्य होणार आहे.

पोस्ट ऑफीसेस १०० टक्के कोअर बँकिंग प्रणालीवर येणार असल्याने पोस्ट ऑफीस खाती आणि बँक खाती यांच्यामध्ये निधीचे ऑनलाईन हस्तांतरण देखील शक्य होईल. यामुळे विशेषत: ग्रामीण भागातील शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी इंटर-ऑपरेबिलीटी आणि आर्थिक समावेशन सुविधा उपलब्ध होणार आहे, असे अधिक्षक डाकघर यांनी कळविले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129