
सिध्दिविनायक टेक्निकल कँम्पसच्या विद्यार्थ्यांनी मारली कबड्डी स्पर्धेत बाजी
MH 28 News Live, खामगाव : स्थानिक श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरींग शेगांव येथे आयोजित प्रो कबड्डी स्पर्धा दि. २५, २६ मार्च रोजी संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये इंजिनिअरींग तथा पॉलीटेक्नीक च्या विद्यार्थ्यांचा सहभाग मोठया संख्येने सहभाग नोंदविला होता. सुरु असलेल्या स्पर्धेमध्ये अंतीम फेरीमध्ये सिध्दीविनायक टेक्नीकल कॅम्पस व श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरींग च्या विद्यार्थ्यांमध्ये खेळल्या गेली. या चुरशीच्या सामन्यात सिध्दीविनायक टेक्नीकल कॅम्पसच्या विद्यार्थ्यांनी पहिल्या क्रमांकावर बाजी मारत ही स्पर्धा जिंकली.
या स्पर्धेमध्ये वैभव इंगळे, श्रीकांत मुंडे, ध्रव ठाकुर, शुभम सुलताने, सुरज पवार, धिरज माळी, साहील मिसाळ या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या स्पर्धेचे प्रथम बक्षिस रुपये ७०००/- संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. सोमाणी सर यांच्या हस्ते देण्यात आले. या विजयी संघाचे कौतुक महाविद्यालयाचे अध्यक्ष मा. सागर फुंडकर, उपाध्यक्ष मा. आमदार आकाशदादा फुंडकर तसेच प्राचार्य डॉ. अनंत कुळकर्णी, प्राचार्य पराग कोल्हे यांनी केले आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button