
बळीराजाची समृद्धी आणि मतदारसंघाच्या विकासासाठी श्वेताताईंनी मागीतला रामलल्लाचा आशीर्वाद वाढदिवसानिमित्त अयोध्येतील श्रीराम मंदिरास भेट व दर्शन
चिखली : ” माझ्या चिखली मतदारसंघातील कष्टकरी शेतकरी व सर्वसामान्यांचे जीवन समृद्ध होऊ दे तसेच मतदारसंघातील शहर व ग्रामीण भागाच्या विकासासाठी मला नवी शक्ती व प्रेरणा दे ” असे आशीर्वाद आ. श्वेताताई महाले यांनी आयोध्येतील श्री रामलल्लाच्या समोर नतमस्तक होताना मागितले. दि. २७ मार्च रोजी आपल्या वाढदिवसानिमित्त आ. महाले यांनी अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरास सहकुटुंब भेट दिली असता त्यांनी रामरायाच्या मूर्तीचे दर्शन घेऊन आपला वाढदिवस साजरा केला.
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य, आ. श्वेताताई महाले यांचा वाढदिवस २७ मार्च रोजी चिखली मतदारसंघात विविध उपक्रमांचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. यावर्षी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून आ. महाले यांनी अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या नव्या भव्य वास्तूला भेट देण्याचा संकल्प केला होता. या संकल्पची पूर्तता त्यांनी आज केली. आपले पती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सचिव विद्याधर महाले, मुलगा राजन्य, वडील अंकुशराव पाटील, आई मीनाताई पाटील, भाऊ ऋषभ पाटील, भावजय कांचन पाटील, तसेच आपल्या भगिनी पूजा अरुण पाटोळे व भाच्यांसह आ. श्वेताताई महाले आज सकाळी अयोध्या येथे पोहोचल्या. तेथे त्यांनी प्रभू श्रीरामांच्या जन्मभूमीवर साकारलेल्या भव्यदिव्य मंदिराला भेट दिली. यावेळी महाले व पाटील कुटुंबीयांनी श्री रामालांचे मनोभावे दर्शन घेतले.
विकासाचे काम मुखात जय श्रीराम
आमदारकीची पहिलीच टर्म गाजवणाऱ्या श्वेताताई महाले यांनी अल्पावधीतच आपल्या धडाकेबाज कार्यशैलीचा ठसा केवळ चिखली मतदारसंघावरच नव्हे तर बुलढाणा जिल्ह्यावर आणि संपूर्ण राज्यावर उमटवला आहे. मागील केवळ अडीच वर्षात भाजपा – शिवसेना महायुती शासन सत्तेवर आल्यापासून आ. महाले यांनी सुमारे २५०० कोटी रुपये पेक्षाही अधिक रकमेचा विकास निधी आपल्या मतदारसंघात खेचून आणला असून त्याद्वारे शहर व ग्रामीण भागात मोठ्या संख्येने अभूतपूर्व विकासकामे सुरू केली. यातील बरीच विकास कामे पूर्णत्वास गेली असून पुष्कळशी कामे लवकरच मार्गी लागत आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्या वाढदिवसानिमित्त आ. महाले यांनी आयोध्यातील श्रीराम मंदिराचे दर्शन घेणे योग हा एक अपूर्व असा योग म्हणावा लागेल. दर्शन घेताना श्रीराम चरणी नतमस्तक झालेल्या आ. श्वेताताई महाले यांनी आपल्या मतदारसंघातील गोरगरीब, सर्वसामान्य नागरिक, कष्टकरी शेतकरी तसेच महिला व युवकांच्या जीवनात आनंदाचे क्षण फुलवण्यासाठी व विकासकार्याला अधिक जोमाने गती देण्यासाठी आपल्याला सतत प्रेरणा व शक्ती मिळावी अशी प्रार्थना करत श्री रामरायाचे आशीर्वाद मागितले.