
रायपूर प्रा. आ. आरोग्य केंद्राची होणार ग्रामीण रूग्णालयात रुपांतर; आ. श्वेताताई महाले यांच्या प्रयत्नांना यश परिसरातील नागरिकांना मिळणार अद्ययावत आरोग्य सेवा
MH 28 News Live / चिखली : चिखली विधान सभा मतदार संघातील रस्ते, वीज, पाणी आदी मूलभूत गरजा पूर्ण करत असतानाच नागरिकांच्या आरोग्याकडेही आ. श्वेताताई महाले यांचे विशेष लक्ष असते . याची प्रचिती रायपूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची ग्रामीण रूग्णालय म्हणुन श्रेणी वाढ मान्यता मिळविल्याने आली आहे. रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्राची श्रेणी वाढ करुन ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय म्हणुन विशेष बाब म्हणुन मान्यता मिळाल्याने आ श्वेताताई महाले यांच्या प्रयत्नांना फार मोठे यश आले आहे.
या श्रेणी वाढीसाठी व ग्रामीण रुग्णालयासाठी आ. श्वेताताई महाले यांनी केलेले प्रयत्न व पाठपुरावा यामुळे रायपूर परिसरातील नागरिकांना आता अद्ययावत आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. रायपूर हे मोठी बाजारपेठ असून या गावाला जवळपास ३५ खेडी लागून आहेत. याशिवाय हिंदू व मुस्लिमांचे श्रद्धास्थान असलेला सैलानी बाबा दर्गा सुद्धा येथून केवळ ५ किमी. अंतरावर आहे. सैलानी येथे दरवर्षी लाखो भाविक येत असतात. तसेच सैलानी येथे सैलानी बाबांची फार मोठी यात्रा सुद्धा त्याठिकाणी भरत असल्याने रायपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परंतु, पाहिजे त्या प्रमाणात आरोग्य सुविधा व तज्ञ आरोग्य अधिकारी नसल्याने रुग्णांना उपचारासाठी बुलडाणा किंवा छत्रपती संभाजीनगर येथे जावे लागते. प्रा. आ. केंद्र रायपूर येथे उपचाराच्या सुविधा नसल्याने अनेक रुग्ण दगावलेले आहेत.
सैलानी याठिकाणी मनोरुग्ण ठीक होतात अशी श्रद्धा असल्याने त्याठिकाणी फार मोठ्या प्रमाणात मनोरुग्ण व त्यांचे नातेवाईक येण्याचे प्रमाण फार मोठे आहे. मनोरुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन आतापर्यंत अनेक मनोरुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची लुबाडणूक झालेली आहे. तसेच अनेक मनोरुग्णाचा बळीसुद्धा गेलेला आहे. तसेच सैलानी येथे मनोरुग्णालय व्हावे अशी बऱ्याच दिवसांपासूनची मागणी आहे परंतु सदर मनोरुग्नालायाची मान्यता प्रलंबित आहे. त्यामुळे मनोरुग्नांसोबतच त्यांच्या नातेवाईकांची सुद्धा प्रचंड हेळसांड होत आहे.
रायपूर हे गाव सुद्धा १० हजाराच्या वरच्या लोकसंख्येचे गाव असून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीलागत आरोग्य विभागाची जागा उपलब्ध आहे. त्यामुळे येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची दर्जावाढ करून ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्यात यावा अशी मागणी आ. महाले यांनी दि ४ सप्टेंबर २०२१ रोजी व दि. २३ नोव्हेंबर २०२३ रोजी केली होती. तसा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला होता. त्याला शासनाने दि. ९ जुलै रोजी म्हणजे काल मंजुरी दिली. त्यामुळे आता रायपूर येथे असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूपांतर लवकरच ३० घाटांच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये होणार आहे. त्यमुळे रायपूरसह या जिल्हा परिषद सर्कलमधील सर्वच गावांना प्रस्तावित आरोग्य ग्रामीण रुग्णालयाच्या सुविधांचा लाभ यापुढे मिळणार मिळेल. ग्रामीण भागातील रुग्णांना सर्पदंश असो किंवा महिलांची प्रसूती शस्त्रक्रिया असो आदी सर्व तातडीच्या वैद्यकीय उपचारांची उपलब्धता येथे केली जाणार असून इतर रुग्णांवर देखील रायपूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येतील. आ. श्वेताताई महाले यांनी आपल्या मागणीची तातडीने दखल घेऊन शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले; त्याबद्दल रायपूर व परिसरातील नागरिकांकडून आ. श्वेताताई महाले यांच्या प्रति आभार व्यक्त होत आहेत.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button