♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

चिखलीत आलेल्या यात्रेकरुला अज्ञात चोरट्याने लावला १० हजाराचा चूना

MH 28 News Live, चिखली : जालना येथील एक दर्शनार्थी रेणुका माता वहन दर्शनाकरिता आला असता तहसील कार्यालय चिखली समोर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्याच्या त्यांच्या खिशातील रोख १० हजारो रुपयांसह महत्त्वाच्या कार्ड्सची चोरी केली. याबाबत अज्ञात चोरट्याविरुध्द चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

किशोर हेमंतराव चिखलीकर वय ५२ वर्ष राहणार माळीपुरा चिखली हल्ली मु. जालना हे दि. १६ एप्रिल रोजी रेणुका देवी यात्रेत दर्शनासाठी आली होते. रात्री साडेदहा ते अकरा वाजेदरम्यान तहसील कार्यालयासमोर त्यांच्या खिशातून पिवळ्या कलरचे पाकीट त्यामध्ये नगदी 10,000/-, पॅन कार्ड, एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड व ओळखपत्र असे चोरून नेले आहे रिपोर्ट वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129