जवळखेड शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अश्विनी मुळे तर उपाध्यक्ष पदी अंबादास मतकर
MH 28 News Live, देऊळगाव राजा : तालुक्यातील जवळखेड येथील जिल्हा परिषद शाळेची शाळा व्यवस्थापन समितीची कार्यकारणी दिनांक 23 एप्रिल 2022 रोजी संपन्न झाली. यामध्ये शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अश्विनी ज्ञानेश्वर मुळे तर उपाध्यक्ष म्हणून अंबादास विठोबा मतकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या समितीचे सदस्य म्हणून उज्वला समाधान गवई, मंगला सुरेश पवार, यशोदा विष्णू गायकवाड, लिलावती बालाजी गाटोळे, प्रतिभा विक्रम राजेजाधव, दत्तू गणपत गाटोळे, नरहरी राधाकिसन जाधव, समाधान राजू गवई, देवानंद सुखदेव शेजुळ, यांची सर्वानुमते सदस्य म्हणून निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक खेडेकर सर व तसेच त्यांचे सर्व कर्मचारी वृंद यांनी ही शाळा व्यवस्थापन समितीची निवडणूक व्यवस्थितरित्या पार पाडली. तसेच सर्व नवनियुक्त पदाधिकारी व सदस्य यांना मुख्याध्यापक खेडेकर सर यांनी बोलताना सांगितले की आमच्या शाळेतील कोणत्याही कर्मचारी किंवा मी स्वतः माझ्या जबाबदारीला चुकत असेल तर आम्हाला तुम्ही स्वतःहून सांगत चला व कोणत्या ही पालक मंडळीचा काही अडचण असली तर तीही सांगत चला कारण माझ्या हाताने या जवळखेड गावातील असंख्य माझे विद्यार्थी माझ्या हातून घडलेले आहे व त्यांनी या गावाचे व या जिल्हा परिषद शाळेचे नाव या गावातच नव्हे तर महाराष्ट्रात नाव उंच केलेले आहे.तसेच इथून पुढेही माझ्या शाळेतील विद्यार्थी या गावाचे व शाळेची नाव लौकिक करतील अशा पद्धतीने आम्ही जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षकवृंद पुरेपूर प्रयत्न करू अशी त्यांनी पालक मंडळी व शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व मंडळींना आश्वासन दिले. शाळा व्यवस्थापन समितीची नवीन अध्यक्ष अश्विनी मुळे यांनी जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षक वृंद तसेच गावातली पालक मंडळी यांना बोलताना सांगितले की
मी माझ्या पदाला पूर्ण पणे न्याय देण्याचा प्रयत्न करेल व माझ्यावर पालक वर्गानी जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला मी तढा जाऊ देणार नाही अशी ग्वाही नवनियुक्त अध्यक्ष यांनी यावेळी दिली. यावेळी गावातील सर्व पालक वर्ग, पक्षीय नेते ,गावकरी मंडळी व तरुण युवक उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्यांची सर्व पालक मंडळी शिक्षक वृंद व गावकरी अभिनंदन करीत आहे. गावातील युवक नेता अनंता गवई यांनी बोलताना सांगितले की जिल्हा परिषदेतील मुख्याध्यापक खेडेकर सर यांनी येथे आल्यापासून या गावातील विद्यार्थ्यांना पुरेपुर घडवण्याचा प्रयत्न केला आहे व या अगोदरही त्यांच्या हातून खूप विद्यार्थी चांगल्या चांगल्या पदावर कार्यरत आहे तसेच संपूर्ण गावातील पालक वर्गातून मुख्याध्यापक खेडेकर सरांची व त्यांच्या सर्व शिक्षक वृंद यांची प्रशंसा होत आहे व त्यांचे अभिनंदन करीत आहेत. सर्व गावकरी मंडळी व तसेच पालक मंडळी हे सांगतात की जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक खेडेकर सर हे आपल्याच गावांमध्ये रिटायर्ड होईपर्यंत राहतील व आपले पाल्य चांगल्या प्रकारे घडवतील अशी आशा व्यक्त करीत आहेत.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button