♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

सत्तेच्या मस्तीत मस्त़ असलेल्या सरकारच्या डोक्यात प्रकाश पाडण्यासाठी भाजपचे उद्या कंदील आंदोलन –आ. आकाश फुंडकर

MH 28 News Live, खामगाव : राज्याची सुधारलेली घडी मागील अडीच वर्षाच्या कार्यकाळात महाविकास आघाडी सरकारच्या काळात पुर्ण विस्कळीत झाली आहे. विज पुरवठा खंडीत होत असून आता राज्य़ सरकारने भारनियमन जाहीर केले आहे. हे भारनियमन टाळता येणार नाही असे या राज्याचे मंत्री सांगत आहे. सत्तेच्या मस्तीत असलेल्या या सरकारच्या कार्यकाळात कोळसा संपत चालला असल्याचे सांगण्यात येत आहे. वास्त़विक पाहता वेळीच नियोजन करुन कोळसा आरक्षीत करणे आवश्यक़ होते. परंतु या सरकारच्या काळात सर्व नियोजन कोलमडले असून सत्तेच्या मस्तीत असलेल्या सरकारच्या डोक्यात प्रकाश पाडण्यासाठी भाजपा तर्फे रविवार दि. 24 एप्रिल रोजी सायंकाळी 7.00 वा कंदील आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड आकाश फुंडकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.

वीज वितरणाची, वीज निर्मितीची एकूण परिस्थिती अतिशय चिंताजनक झालेली आहे. महाभकास सरकारच्या विरोधात भाजपा मैदानात उतरली असून वाढलेले विजेचे दर, शेतकऱ्यांचे कनेक्शन कापणे आणि आता सुरू झालेले लोडशेडिंग या विरोधात उद्या रविवार दि. 24 एप्रिल रोजी सायंकाळी ठीक 7 वाजता आपल्या मंडलात जिथे अंधार असेल अश्या ठिकाणी भव्य कंदील आंदोलन करायचे आहे. अशा सुचना भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड आकाश फुंडकर यांनी सर्व जिल्हा पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष यांना केले आहेत.
काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सेाबत ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केलेली चर्चा निष्फऴ ठरली असून राज्यात भारनियमन अटळ आहे अशी घोषणाच उर्जामंत्री यांनी या बैठकी नंतर केली त्यामुळे या राज्याचे मुख्यमंत्री देखील यावर काहीच तोडगा काढू शकत नाही हे स्पष्ट़ झाले आहे. आपल्या नाकर्तेपणाचे खापर हे सरकार अदानी व केंद्र सरकारवर फोडत आहे. मात्र आज देशभरात इतर राज्यात मुबलक प्रमाणात विज उपलब्ध़ आहे. भाजपाच्य काळात मागील 5 वर्षात लोडशेडींग नव्हते. हे सरकार आल्यापासून सर्व व्यवस्था कोलमडली असून मुख्यमंत्री आणि मंत्री यांना राज्याच्या जनतेशी काहीही देणे घेणे नाही. हे फक्त़ सत्ता टिकवण्यासाठी व सत्तेची मलाई खाण्यासाठी एकत्र आले आहे. हे सरकार आल्यापासून शेतकऱ्याकडून विद्युत रोहित्रे लावण्यासाठी पैसे भरुन घेत आहे व नादुरुस्त़ रोहित्रे देण्यात आल्यामुळे ते वारंवार जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या शेतातले उभे पिक करपत आहे. शेतकऱ्यांच्या शेतात पाणी असून शेतकरी पिकाला आपल्या डोळयासमोर जळतांना पाहत आहे. अत्यंत वाईट अवस्था असून आसमानी संकटातून शेतकरी सुटला की हे सरकार सुलतानी संकट उभे करते. अशा सर्व शेतकरी बांधवांनी उद्याच्या “कंदील” आंदोलनात मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड आकाश फुंडकर यांनी केले आहे.

याबाबत भाजपा लोकप्रतिनिधी, जिल्हा पदाधिकारी, तालुकाध्यक्ष व तालुकापदाधिकारी विविध आघाडयांचे अध्यक्ष् पदाधिकारी यांनी या आंदोलनात मोठया संख्येत सहभागी होऊन आपला रोष व्यक्त़ करावा असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी केले आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129