♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर मोदी सरकार शेतकऱ्यांना देणार ही भेट

MH 28 News Live : मोदी सरकारने आता पीएम किसन योजनेचा 11 वा हप्ता जमा करण्यासाठी अक्षय तृतीयाचा शुभ मुहूर्त साधला असल्याची माहिती समोर आली आहे. अक्षय तृतीया मे महिन्याच्या सुरवातीच्या आठवड्यात आहे. त्यामुळे मे महिन्याच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांना पीएम किसानच्या 11 व्या हप्त्याच्या लाभ होणार आहे. त्याच बरोबर गेल्यावर्षी देखील मे महिन्यातच शेतकऱ्यांना 2 हजार रुपयांचा हप्ता मे महिन्यात जमा करण्यात आला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणारी पीएम किसान योजना सुरू केली आहे. या योजनेला आता जवळपास ६ वर्षे इतका कालावधी पूर्ण होत आला आहे. आत्तापर्यंत पीएम किसान योजनेअंतर्गत 12 कोटी शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. त्यासह आता शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 10 व्या हप्त्याला 4 महिने उलटून गेले आहेत. त्यामुळे आता शेतकरी 11 व्या हप्त्याच्या प्रतिक्षेत आहेत. त्याचमुळे आता मोदी सरकारने 11 वा हप्ता जमा करण्यासाठी शुभ मुहूर्त गाठला आहे.

कधी होणारं
पात्र शेतकऱ्यांनाच मिळणार 11 वा हप्ता

केंद्र सरकारच्या या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र आहेत याची प्रक्रिया राज्यातील यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. याचसंदर्भात 11 व्या हप्त्यासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत. यासाठी शेतकरी पात्र असले पाहिजेत. पात्र शेतकऱ्यांना त्यांचे पी एम किसान खाते तपासावे लागेल. Rft Signed By State For 11 installment असा उल्लेख या शेतकऱ्याच्या खात्यावर करण्यात येईल तो शेतकरी या 11 व्या हा त्यासाठी पात्र असेल. त्यासह FTO Generated and Payment Confirmation Is Pending असा मेसेज ज्या शेतकऱ्यांना येईल त्या शेतकऱ्यांची 11 व्या हप्त्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129