आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रीया सुरू. 29 एप्रिल 2022 पर्यंत प्रवेश घेण्यासाठी मुदतवाढ
MH 28 News Live, बुलडाणा : बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार अधिनियम सन-2009 अन्वये दरवर्षी संपुर्ण राज्यामध्ये RTE25% प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार सन 2022-23 या वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया सदयस्थितीत सुरु असून आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेशाबाबतची लॉटरी(सोडत) बुधवार 30 मार्च 2022 रोजी राज्यस्तरावर काढण्यात आलेली आली आहे. आरटीई 25 टक्के अंतर्गत प्रवेशपात्र व प्रतिक्षा यादीवरील विदयार्थ्यांची यादी शासनाची अधिकृत वेबसाईट www.25admission.maharashtra.gov.in जाहीर करण्यात आली असून पालकांना वेबसाईसला भेट देवून यादी पाहता येईल.
निवडपात्र ठरलेल्या पालकांना मोबाईलवर मेसेज पाठविण्यात आलेले आहेत. आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेअंर्गत निवड झालेल्या विदयार्थ्यांना शासन निर्देशानुसार 20 एप्रिल 2022 पर्यंत मुदत देण्यात आलेली होती. मात्र शासनाने सन 2022-23 वर्षातील आरटीई 25 टक्के प्रक्रियेअंतर्गत निवड झालेल्या विदयार्थ्यांना प्रवेश घेण्याकरीता दि.29 एप्रिल 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तरी याबाबत जिल्हयातील सर्व शाळा, पालक व तालुकास्तरावरील संबधित यंत्रणा यांनी नोंद घ्यावी. तसेच जिल्हयातील पालक, शाळा, तालुकास्तरावरील संबधित यंत्रणा यांनी जास्तीत जास्त बालकांना प्रक्रियेमध्ये सहभागी करण्याचे दृष्टीने प्रयत्न करावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, बुलडाणा कार्यालयाचे वतीने करण्यात येत आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button