
जिल्ह्यातील नवोदीत व ‘स्टार्ट अप्सनी स्टार्ट- अप आणि नाविन्यता आधारित ज्ञान’ कार्यक्रमात सहभागी व्हावे
MH 28 News Live, बुलडाणा : राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन विभागातंर्गत स्थापना झालेल्या महाराष्ट्र नाविन्यता सोसायटी मार्फत नाविण्यपूर्ण दृष्टीकोनांना व प्रयत्नांना उत्तेजन देणे, राज्यात नाविण्यपूर्ण उद्योगांसाठी पुरक असे वातावरण निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. या दृष्टीकोनातून सिस्को लॉचपॅड यांचे सहाकार्याने भारताच्या टेक्नोप्रेन्यारशिप मालिकेच्या महाराष्ट्र आवृत्तीचे आयोजन करत आहे. त्यानुसासर सुरूवातीच्या टप्प्यात तरूण विद्यार्थ्यांसाठी स्टार्ट अप, व्यवसाय – उद्योजकांसाठी आधारित ज्ञान सत्र आयोजित करण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील नवोदीत व ‘स्टार्ट अप्सनी स्टार्ट- अप आणि नाविन्यता आधारित ज्ञान’ कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
जेथे जिल्ह्यातील नवोदीत आणि स्टार्ट-अप्संना त्यांची कल्पना कशी तयार करावी, टिकवून ठेवावी, विस्तारीत व्हावे आणि मोठे कसे करावे याबाबत ज्ञान दिले जाणार आहे. या कार्यक्रमात उत्पादन विकास, डिझाईन विचार, तंत्रज्ञान व आर्थिक व्यवस्थापन व्यवसाय ज्ञानाचा एक भाग म्हणून निधी कसा उभारावा यासारख्या विविध विस्तृत विषयांचा समावेश आहे. यासांबधी बिझीनेस सेशसनचे सर्व सत्र 25 ते 29 एप्रिल दरम्यान सायं 5 ते 6 वाजेदरम्यान व टेक्नॉलॉजी सेशनचे सर्व सत्र 2 मे ते 6 मे दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. त्यानुसार 26 एप्रिल रोजी प्रोडक्ट डेव्हलपमेंट, 27 एप्रिल रोजी क्रिएटींग अँण्ड सेफ गार्डींग आय.पी, 28 एप्रिल फायनान्स फंडामेंटल्स, 29 एप्रिल रोजी फंड रेझिंग, टेक्नॉलॉजी सेशनमध्ये 2 मे रोजी ए.आय व एम. एला, 3 मे रोजी एंटरप्राईज क्लाऊड सोल्युशन्स- मोराकी, 4 मे रोजी सिस्को डिजीआइजेस अँण्ड सेक्युअरस ओ.टी एन्व्हायरमेंट्स, 5 मे रोजी आय.ए.सी ॲण्ड हायब्रीड क्लाऊड, 6 मे रोजी ब्लॉक चेन विषय असणार आहे. तरी या विविध सत्रांत सहभागी होण्यासाठी https://cs.co/CLAPMAHARASHTRA वेबपोर्टलवर विनाशुल्क पूर्वनोंदणी करणे अनिवार्य आहे. त्यायोगे आपणास विविध सत्रात सहभागी होता येईल तसेच यासंबधीच्या अधिक माहितीकरीता technopreneurship@cisco.com या ई-मेलचा वापर करावा, असे आवाहन सहायक आयुक्त श्रीमती बारस्कर यांनी केले आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button