
बुरुंगले महाविद्यालयाचे विद्यापीठ युवा महोत्सवामध्ये सुयश
MH 28 News Live, शेगांव: स्थानिक श्री ज्ञानेश्वर मस्कुजी बुरुंगले विज्ञान व कला महाविद्यालयामध्ये संस्थाध्यक्ष रामविजय बुरुंगले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शैक्षणिक सामाजिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केल्या जाते. त्याचाच एक भाग म्हणून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागातर्फे ब्रजलाल बियाणी महाविद्यालय अमरावती येथे आयोजित युवा महोत्सव २०२१ मध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. त्यामध्ये नकला ( मिमिक्री ) या कला प्रकारामध्ये महाविद्यालयाच्या कु. निशा संजय सोनोने बी. एस्सी. भाग – ३ या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक मिळवून महाविद्यालयाच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवला आहे.
सदर पुरस्कार वितरण सोहळा राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, आमदार सुलभाताई खोडके संस्थाध्यक्ष अशोक राठी. कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, संचालक, विद्यार्थी विकास डॉ. राजीव बोरकर, प्राचार्य डॉ. दीपक धोटे, समन्वयक युवा महोत्सव डॉ. संजय ईश्वरकर. सहसमन्वयक युवा महोत्सव डॉ. दिनेश सातंगे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रफुल्ल गवई, शिव ठाकरे विदर्भ युथ आयकोन इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडल.
तिने मिळवलेल्या या यशाबद्दल मा.संस्थाध्यक्ष रामविजय बुरुंगले. प्राचार्य डॉ. आर. ई. खडसान सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक प्रा. राहुल बारब्दे यांनी तिचे अभिनंदन केले. यावेळी डॉ. डी.एल.भदे, डॉ. कु. वाय. एस. पाटील, डॉ.गणेश तांबटकर, डॉ. कैलास मुळे, डॉ. पी. व्ही. पिंगळे डॉ. कु. रंजना जवंजाळ, प्रा. विनोद आगरकर, डॉ. अजय वाडेकर, प्रा. अमोल नगराळे प्रा. मयूर ठाकरे डॉ. कुरींना देशमुख, प्रा. डॉ. कु. वृषाली शेळके डॉ. प्रसाद देशमुख. प्रा. योगेश वायाळ, प्रा. नितेश घुंगरवार, प्रा. कु. निता तोडकर, प्रा. रवींद्र पुंडे उपस्थित होते.