
सातपुड्याचे नंदनवन सालाईबन येथील झाडे पाण्याअभावी सुकली. महिनाभरापासून डी.पी. जळाली. विद्युत वितरण कंपनीचे दुर्लक्ष
MH 28 News Live, जळगाव जामोद : सातपुड्याच्या पायथ्याशी शांतीनगर नजीक सालाईबन म्हणून सातपुड्याचे नंदनवन आहे. सालाइबन मित्र मंडळ आणि मानद वन्य जीव संरक्षक मंजितसिंगशीख यांच्या नेतृत्वात तरुणाही फाऊंडेशनचे शेकडो कार्यकर्ते येथे झाडे जगविण्यासाठी अविरत प्रयत्न करीत आहेत. कित्येक एकरावर माळरानात हे कार्यकर्ते हिरवळ फुलवित आहेत. गत एक महिनाभरापासून ट्रान्सफर जळाल्यामुळे येथील झाडांना पाणी मिळत नाही. विद्युत वितरण कंपनीला वारंवार निवेदन देऊनही काही फरक पडला नाही. ४२–४३डिग्री च्या वर तापमान गेले असताना सुद्धा कार्यकर्ते डोक्यावर पाणी घेऊन झाडे वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत.
संपूर्ण जिल्ह्यातूनच नव्हे तर जिल्ह्या बाहेरून पर्यटक, निसर्गप्रेमी ,सालाईबन ला येत आहेत. आपापल्यापरीने आपापली सेवा समर्पित करून झाडे जगविण्याचा प्रयत्न करतात, परंतु विद्युत वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता कातखेडे अथवा जामोद ग्रामीण भागाचे कनिष्ठ अभियंता गोलाइत यांना मात्र निसर्गाचे,वृक्षाचे सोयरसुतक नाही. चालू आहे बंद परिसरातील शेकडो आदिवासींनी व निसर्गप्रेमींनी कनिष्ठ अभियंता गोलाईत त्यांच्या जामोद कार्यालयात कित्येक चकरा मारल्या तरीही त्यांनी आदिवासींच्या आणि त्यांच्या प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. ते सातत्याने आदिवासी परिसराकडे दुर्लक्ष करतात. ह्या परिसरातील शेकडो आदिवासी रानावनात राहतात. धोक्याचे जीवन पत्करून अंधारात राहतात. तरीसुद्धा विद्युत वितरण कंपनीला त्यांची दया येत नाही. एक महिना उलटून सुद्धा जळालेला ट्रांसफार्मर विद्युत वितरण कंपनी बदलून दिला नाही. येथील वृक्ष वैभव अशा उन्हाळ्याच्या दिवसात जगवणे फार जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे सालाईबनचा प्रश्न आणि परीसरातील आदिवासींच्या पिण्याच्या पाण्याचा व गुरांच्या पाण्याचा प्रश्न हे गंभीर विषय पाहता विद्युत वितरण कंपनीने या परिसराचा जळालेला ट्रांसफार्मर त्वरित बदलून द्यावा, अशी ह्या परिसरातील निसर्गप्रेमींची व आदिवासी जनतेची मागणी आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button