
अल्पवयीन दोन चुलत बहिणींवर जळगाव जामोदमध्ये केला अतिप्रसंग. दोन आरोपीस अटक, 8 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी
MH 28 News Live, जळगाव जामोद : जळगाव जमोद येथील दोन अल्पवयीन चुलत बहिनींवर अतिप्रसंग करणाऱ्या दोघा आरोपींविरुद्ध स्थानिक पोलीस ठाण्यात 12 एप्रिल रोजी फिर्याद दाखल झाली होती. या तक्रारीवरून अटक केलेल्या त्या दोन आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
दोन चुलत बहिणींना फूस लावून पळवून नेऊन त्यांना लग्नाचे आमिष दाखवून अतिप्रसंग करणार्या त्या दोनही आरोपींना अटक करून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत 8 मे पर्यंत करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती की, यातील पिडीत मुलीच्या वडिलांने तक्रार दाखल केली की मुलीचे वडील पत्नी पासून वेगळे राहत असून ते जळगाव जामोद येथील एका कॉम्प्लेक्समध्ये राखवालीचे काम करतात. त्यांची पत्नी वय 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला घेऊन फिर्यदीच्या मूळ गावी वडगाव गड येथे त्याच्या भावाच्या घरी त्याच्या कुटुंबा समवेत राहते. फिर्यदीच्या भावालाही एक मुलगी असून तिचे वय 13 वर्ष 11 महिने आहे दोन्हीही मुली “अज्ञान” आहेत.
पहिल्या मुलीस प्रेम पाटील रा. भास्तन ता. खामगाव व दुसऱ्या मुलीला मनोज शिंगोटे रा. नांदुरा हे दोघे भेटण्यासाठी येत असत.
” ह्या मुली अज्ञान आहे ह्याचे शिक्षण चालू आहे तुमच्या व त्यांच्या वयात अंतर जास्त आहे ” असे त्या दोघांना डिसेंबर 2021 मध्ये समजावून सांगितले होते. ” तुम्ही जर ऐकले नाही तर पोलीस स्टेशनला तक्रार देऊ ” त्यावेळेस प्रेम पाटील व मनोज शिंगोटे यांनी आम्ही यापुढे मुलींना भेटणार नाही किंवा त्रास देणार नाही असे म्हटले होते. मात्र त्या दोन्ही मुलांनी काही दिवसांनी ह्या मुलींना लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर यांनी दोन्ही मुलींचा शोध घेण्यासाठी पो उ नी आवारे मॅडम, ना पो का सुशिर व पो का सोळंके यांचे तपास पथक करून गुप्त माहितीच्या आधारे मध्य प्रदेशातील इंदोर येथे जाऊन त्यांचा शोध घेतला असता दोघी चुलत बहिणी त्या दोन्ही आरोपीसमवेत खंडवा जिल्ह्यातील रिचिडी येथे आरोपीचा मित्र चैनसिंग डावर ह्यांच्या घरी मिळून आल्या. त्यांना त्याब्यात घेऊन पथकाने जळगाव पो. स्टे. ला दि. 23 एप्रिलला आणले. मुलींना विचारपूस केली असता त्यांच्या सागण्यावरून आरोपींनी लग्नाचे अमिष दाखवून त्याच्या सोबत शारीरिक संबंध केले असे मुलींच्या बायना वरून स्पष्ट झाले. यावरून ह्या गुन्ह्यामध्ये कलम 363,366,376,376(2)(n) 376(3) भा. द. वि. सह बालकाचे लैगिंक अपराधा पासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलाम 4, 6 कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपी मनोज तुकाराम शिंगोटे वय 26 वर्ष व पवन संजय झोये वय 19 वर्ष रा. भास्तन ता. खामगाव यांना न्यायालयात नेले असता कोर्टाने आरोपींना दि 8 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button