
जाँब अलर्ट – चिखली येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ( ITI ) भरती मेळाव्याचे आयोजन
MH 28 News Live, बुलडाणा : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चिखली येथे महींद्रा अँन्ड महींद्रा लिमीटेड, चाकण, पुणे या कंपनीकरीता 4 मे 2022 रोजी सकाळी 9.30 वाजता ट्रेनी पदांसाठी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर पदाकरीता एसएससी, एचएससी, आयटीआय उत्तीर्ण व वयाची 18 ते 29 वर्ष पुर्ण झालेले असावे. उमेदवार वैद्यकीयदृष्ट्या सुदृढ असावा. कंपनीतर्फे बस, कँटीन, मेडीकल इन्शुरन्स, युनिफॉर्म आदी सुविधा उपलब्ध असून वेतन दरमहा 12 हजार ते 13 हजार 500 देण्यात येणार आहे. तरी इच्छूक उमेदवारांनी मुलाखतीला येण्यापूर्वी 2 मे 2022 रोजी सायं 5 वाजेपर्यंत शासकीय आयटीआय बुलडाणा, चिखली, मेहकर, लोणार, दे.राजा, सिं.राजा येथे नाव नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी शासकीय आयटीआय चिखली येथे श्री. कुलथे यांच्या 9822780535, श्री. बेदरकर यांच्या 9405105884 मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य व्ही. बी बचाटे यांनी केले आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button