मुद्रांक शुल्काच्या दंडाबाबत शासनाची दंड सवलत अभय योजना जाहीर
MH 28 News Live, बुलडाणा : मुद्रांक शुल्काच्या तुटीच्या भागावरील शास्तीची कपात करण्याकरीता मुद्रांक शुल्क आकारण योग्य आहे. अशा संलेखाच्या बाबतीत महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील विविध कलमातील तरतुदीनुसार मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांमधील 31 मार्च 2022 पुर्वी नोटीस मिळाली आहे. अशा प्रकरणांवरील देय असणारी शास्तीच्या रक्कमेवर सुट देण्यात आली आहे.
सदर योजनेतंर्गत अर्ज दाखल करण्याची मुदत दिनांक 1 एप्रिल 2022 ते 30 नोव्हेंबर 2022 असणार आहे. तसेच 1 एप्रिल 2022 ते 31 जुलै 2022 या कालावधीसाठी दंड सवलत ही दंड रकमेच्या 90 टक्के असणार आहे. त्याचप्रमाणे 1 ऑगस्ट 2022 ते 30 नोव्हेंबर 2022 या कलावधीसाठी दंड सवलत ही दंड रकमेच्या 50 टक्के असणार आहे. सदर योजनेचा अर्ज www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या ऑनलाईन अर्जातील परिपूर्ण माहिती संकेतस्थळावर भरल्यानंतर त्याची छापील प्रत अर्जासोबत सादर करणे अनिवार्य आहे. तरी या दंड सवलत अभय योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी दि. शं भोसले यांनी केले आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button